शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! आई-वडिलांच्या मृतदेहाशेजारी सापडलं 4 दिवसांचं बाळ; 3 दिवसांपासून घर बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 10:17 IST

धक्कादायक बाब म्हणजे मृत दाम्पत्याचं 4-5 दिवसांचं बाळ जिवंत आढळून आलं. घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने ही बाब उघडकीस आली.

उत्तराखंडमधील डेहरादूनमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका घरातून पती-पत्नीचे मृतदेह सापडले आहेत. मृतदेह तीन दिवस जुने असल्याने ते कुजलेले होते. धक्कादायक बाब म्हणजे मृत दाम्पत्याचं 4-5 दिवसांचं बाळ जिवंत आढळून आलं. घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने ही बाब उघडकीस आली. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले असून मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तरुणाने कर्ज घेतलं होतं, ते फेडू न शकल्याने त्याने पत्नीसह आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे.

13 जून रोजी पोलीस कंट्रोल रुमला टर्नर रोडवरील एका घरातून खूप दुर्गंधी येत असल्याने आत मृतदेह असू शकतो अशी माहिती मिळाली होती. माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे प्रमुख आपल्या टीमसह टर्नर रोडवरील C13 घराजवळ पोहोचले. एक दरवाजा बाहेरून बंद होता तर दुसऱ्या दाराला आतून कडी लावली होती दरवाजा उघडला असता दोन मृतदेह जमिनीवर पडलेले दिसले. 

खोलीत 4-5 दिवसांचं बाळ सापडलं

पोलिसांच्या पथकाने घरामध्ये झडती घेतली असता खोलीत 4-5 दिवसांचं बाळ सापडलं. मुलगी जिवंत होती, पोलिसांनी तिला तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठवलं. पोलिसांनी एफएसएल टीमला घटनास्थळी पाचारण करून तपास केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मृतदेहांवर कोणत्याही जखमेच्या खुणा आढळल्या नाहीत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवले.

एक वर्षापूर्वी झालेलं लग्न 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह हे सहारनपूर जिल्ह्यातील नागल पोलीस स्टेशनच्या चहलोली भागातील 25 वर्षीय काशिफचा मुलगा मोहताशिम आणि त्याची पत्नी अनम (२२) यांचे आहेत. चार महिन्यांपूर्वीच तs या घरात राहायला आले होते. सोहेल असं घरमालकाचं नाव असून तो उत्तरकाशी येथील जोशीडा येथील रहिवासी आहे. मृताच्या कुटुंबीयांना घटनास्थळी बोलावले असता काशिफचे दोनदा लग्न झाल्याचे समजले. पहिल्या लग्नापासून पाच वर्षांची मुलगी आहे. तर, वर्षभरापूर्वी त्याने अनम नावाच्या मुलीशी लग्न केलं होतं.

पहिल्या पत्नीचे नाव नुसरत असून, माझा नवरा दोन-तीन दिवसांपासून फोन उचलत नसल्याचे तिने पोलिसांना सांगितले. माझे शेवटचे बोलणे 10 जून रोजी रात्री 11 वाजता होते. काशिफने उधार घेतलेले पाच लाख रुपये परत करायचे असल्याने उद्या गावी येणार असल्याचे सांगितले. दोन-तीन वेळा फोन आला नाही आणि नंतर फोन बंद झाला. मी येथे आले तेव्हा घराला कुलूप असल्याचे दिसले. त्यानंतर मी माझ्या सासऱ्यांना आणि भावाला याबद्दल सांगितले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंड