शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus Update: दररोज आढळतील ४ ते ८ लाख रुग्ण; आयआयटी कानपूरचे प्रोफेसरांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 06:12 IST

प्राे.  अग्रवाल कोरोना वाढीच्या संदर्भातील सांख्यकीय तज्ज्ञ मानले जातात. दुसऱ्या लाटेसंदर्भात त्यांनी केलेली सांख्यकीय भविष्यवाणी खरी ठरली होती.   

- सुरेश भुसारीलोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सध्या देशात आलेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची उच्चतम पातळी १५ जानेवारीपर्यंत राहणार असून या दिवसांत देशात रोज ४ ते ८ लाख नवे रुग्ण आढळतील. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी दररोज दीड लाख खाटांची आवश्यकता राहील, अशी माहिती कानपूर आयआयटीचे प्रोफेसर मनिंदर अग्रवाल यांनी ‘लोकमत’शी बातचीत करताना दिली.प्राे.  अग्रवाल कोरोना वाढीच्या संदर्भातील सांख्यकीय तज्ज्ञ मानले जातात. दुसऱ्या लाटेसंदर्भात त्यांनी केलेली सांख्यकीय भविष्यवाणी खरी ठरली होती.   

 प्रो. अग्रवाल म्हणाले, “डेल्टापेक्षा ओमायक्रॉन व्हेरिएंटची ही लाट अधिक वेगाने पसरणार आहे. येत्या १५ जानेवारीपर्यंत ही लाट वाढत जाईल. या काळात देशात ४ ते ८ लाख कोरोनाबाधित आढळतील. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी देशात किमान दीड लाख खाटांची व्यवस्था रुग्णालयांमध्ये करावी लागणार आहे. 

या लाटेचा सर्वाधिक फटका दिल्ली व मुंबई या दोन महानगरांना बसणार असल्याचे सांगून प्रो. अग्रवाल म्हणाले, दिल्लीत रोज ३५ ते ७० हजार नवे कोरोनाबाधित आढळतील त्यांच्यावर उपचार करण्यासाठी रोज १२ हजार खाटांची व्यवस्था रुग्णालयांमध्ये करावी लागेल. मुंबईत कोरोनाबाधित ३० ते ६० हजार आढळून येतील. 

संक्रांतीनंतर ओसरणारया लाटेचा अत्युच्च बिंदू १५ जानेवारीपर्यंत राहील. परंतु त्यानंतर ही लाट ओसरायला सुरूवात होईल. जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही लाट ओसरलेली असेल, असेही प्रो. अग्रवाल यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या