शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

३९0 कोटींचा नवा घोटाळा! हिरे व्यापा-याविरोधात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 07:05 IST

देशात पीएनबीतील नीरव मोदी व मेहुल चोकसी यांचा ११ हजार ४00 कोटी आणि रोटोमॅक कंपनीचा विक्रम कोठारी याचा बँक आॅफ बडोदातील ३,६९५ कोटी रुपयांचा घोटाळा गाजत असतानाच, ओरिएंटल बँक आॅफ कॉमर्सने दिल्लीच्या हिरे व्यापा-याने ३९0 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार सीबीआयकडे केली आहे.

नवी दिल्ली : देशात पीएनबीतील नीरव मोदी व मेहुल चोकसी यांचा ११ हजार ४00 कोटी आणि रोटोमॅक कंपनीचा विक्रम कोठारी याचा बँक आॅफ बडोदातील ३,६९५ कोटी रुपयांचा घोटाळा गाजत असतानाच, ओरिएंटल बँक आॅफ कॉमर्सने दिल्लीच्या हिरे व्यापा-याने ३९0 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार सीबीआयकडे केली आहे.ज्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे, ते सर्व जण बेपत्ता असून, त्यांनी परदेशी पलायन केले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आम्ही वेळोवेळी संचालकांच्या निवासस्थानी चौकशी केली आणि अधिकाºयांना पाठविले, पण गेले १0 महिन्यांपासून ते तिथे राहत नसल्याचे बँकेने म्हटले आहे. यात बँकेच्या कोणी अधिकारी वा कर्मचाºयांचा सहभाग आहे का, हे आता तपासून पाहिले जात आहे.ओरिएंटल बँकेच्या तक्रारीच्या आधारे सीबीआयने द्वारकादास सेठ इंटरनेशनल प्रा. लिमिटेडच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ओरिएंटल बँक आॅफ कॉमर्सने सीबीआयकडे सहा महिन्यांपूर्वी तक्रार केली होती. मात्र, सीबीआयने शनिवारी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात कंपनीचा संचालक सभ्य सेठ, रीता सेठ, कृष्णकुमार सिंह, रवी सिंह आणि कंपनी द्वारकादास सेठ एसआयझेड इनकॉपोर्रेशन यांची नावे आहेत.द्वारकादास सेठ इंटरनेशनल प्रा. लिमिटेडने ओरिएंटल बँक आॅफ कॉमर्स (ओबीसी) या बँकेतून २00७ ते २0१२ या काळात ३९0 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. बँकेकडून तपासणी केली असता, कर्ज घेताना लेटर आॅफ क्रेडिटचा वापर करण्यात आला होता.मौल्यवाल वस्तू व सोन्याच्या खरेदीसाठी या लेटर आॅफ क्रेडिटचावापर करीत असल्याचे दाखविण्यातआले होते. प्रत्यक्षात द्वारकादाससेठ इंटरनेशनल लिमिटेडने बोगस कागदपत्रांद्वारे घेवाण-देवाण करून हा पैसा परदेशांत पाठविल्याचा आरोप बँकेनेकेला आहे.ही तर जन धन लूट योजनासातत्याने बँक घोटाळे उघडकीस येत असल्याने, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘ही तर मोदी सरकारची जन धन लूट योजना आहे,‘ अशी टीका केली आहे. दिल्लीतील बँक घोटाळा समोर आल्यानंतर राहुल गांधी यांनी हे टिष्ट्वट केले आहे.गुन्हा इतका उशिरा का? या प्रकरणात ओरिएंटल बँकेने ६ महिन्यांपूर्वीच तक्रार केली होती. मग सीबीआयने इतका उशिराने गुन्हा दाखल का केला, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.मोदी, चोकसीचे पासपोर्ट रद्द११ हजार ४०० कोटींचा घोटाळा करून देशाबाहेर पळालेला नीरव मोदी व मेहुल चोकसी यांचे पासपोर्ट केंद्र सरकारने शुक्रवारी रद्द केले. त्यामुळे भारतीय पासपोर्टच्या आधारे त्यांना अन्य देशांत जाता येणार नाही. मात्र, त्या दोघांकडे अन्य देशांचा पासपोर्ट असण्याची शक्यता आहे. त्यांना भारतात येण्यातही अडचणी येतील. अर्थात, त्यांना भारतात यायचे आहे का, हाच खरा प्रश्न आहे.चोकसीचेही पत्रमेहुल चोकसी याने पत्रजारी करून, आपणास या प्रकरणात नाहक गोवल्याचे रडगाणे गाताना, आपण आर्थिक अडचणीत असल्याने तुमची देणी देऊ शकत नाही, असे पत्र गीतांजलीच्या कर्मचाºयांना लिहिले आहे. मी नियतीने जे समोर वाढून ठेवले आहे, त्याला सामोरा जायला तयार आहे. मी चुकीचे वागलेलो नाही. पीएनबी कर्ज प्रकरणात मला नाहक गोवण्यात आले, असा दावा त्याने केला आहे.524कोटींचीमालमत्ता जप्तमोदीच्या २१ स्थावर मालमत्ता हस्तगत केल्या असून, त्यांचे मूल्य ५२३ कोटी ७२ लाख रुपये इतके असल्याची माहिती ईडीतर्फे देण्यात आली. त्यात अलिबागजवळील फार्म हाउस, अहमदनगरमधील १३५ एकर जमीन, मुंबईतील ६ घरे व कार्यालये, पुण्यातील २ फ्लॅट्स, १ सोलर प्लांट या मालमत्तांचा समावेश आहे.सत्य लवकरच लोकांसमोर येईल, असे चोकसीने कर्मचाºयांना उद्देशून लिहिले आहे. आपली बाजू मांडतानाच,३,५०० कर्मचाºयांचे थकलेले पैसे मी देऊ शकत नाही, असे त्याने पत्रात म्हटले आहे. तपास यंत्रणांनी माझी मालमत्ता व बँक खाती गोठवली आहेत. त्यामुळे मला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. तुम्ही मात्र काळजी करू नका. तपास व चौकशीचा ससेमिरा थांबला की, मी स्वत:हून तुमची देणी देईन, मी सध्या आर्थिक अडचणीत आहे, असे त्याने लिहिले आहे.

टॅग्स :bankबँक