शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
2
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
3
"१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय!
4
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
5
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
6
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
7
Astro Tips: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी सोमवारी करा २ लवंगांचा सोपा उपाय; विसरून जाल सगळे अपाय!
8
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
9
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
10
अवकाशातून अत्यंत स्पष्ट फोटो मिळाले असते, पण...; पृथ्वी निरीक्षण उपग्रह प्रक्षेपणाची मोहीम अयशस्वी
11
अबोल वेदना, गोंधळलेली मने : पुरुषांच्या मानसिक आरोग्याची वेळीच दखल घ्या! मानसोपचारतज्ज्ञांचे आवाहन
12
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
13
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
14
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
15
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
16
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
17
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
18
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
19
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
20
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा

जिल्हा बॅँकेस कर्जमाफीचे ३.८७ कोटी निर्णय: आघाडी सरकारच्या धोरणाची युतीच्या काळात अंमलबजावणी

By admin | Updated: February 20, 2016 00:44 IST

जळगाव : आघाडी सरकारच्या काळात कर्ज माफीबाबत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी युती सरकारने करत जिल्हा बॅँकेस बलुतेदार संस्थांच्या कर्ज माफीचे ३ कोटी ८७ लाख रूपये मंजूर झाले आहेत. जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर यांनी सहकार मंत्र्याशी या संदर्भात केलेल्या चर्चेनंतर केवळ जळगाव जिल्हाच नव्हे तर राज्यातील सर्व जिल्हा बॅँकांना हा निधी ...

जळगाव : आघाडी सरकारच्या काळात कर्ज माफीबाबत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी युती सरकारने करत जिल्हा बॅँकेस बलुतेदार संस्थांच्या कर्ज माफीचे ३ कोटी ८७ लाख रूपये मंजूर झाले आहेत. जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर यांनी सहकार मंत्र्याशी या संदर्भात केलेल्या चर्चेनंतर केवळ जळगाव जिल्हाच नव्हे तर राज्यातील सर्व जिल्हा बॅँकांना हा निधी मिळणार आहे. आघाडी सरकारच्या काळात २०१२ मध्ये शेतकर्‍यांना कर्ज माफीचा निर्णय घेण्यात आला होता. शासनाच्या या निर्णयाची अंमलबजावणी करताना बॅँकांच्या त्यावेळी नाकेनऊ आले होते. केवळ कर्जमाफी होणार म्हणून अनेकांकडून कर्ज भरणेही बंद झाले होते. त्यामुळे जिल्हा बॅँका अडचणीत आल्या होत्या. मात्र नंतर शासनाकडून टप्प्याटप्प्याने अनुदान मिळत गेले. मात्र बलुतेदार संस्थांचे माफ केलेले कर्ज अद्याप प्राप्त नव्हते. त्यामुळे जिल्हा बॅँकेच्या एनपीएही वाढलेला दिसत होता. सहकार मंत्र्यांकडे चर्चादरम्यान, याप्रश्नी महसूल मंत्री एकनाथराव खडसे, जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर यांनी सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन याप्रश्नी चर्चा केली. सहकार सचिव सिंधू यावेळी उपस्थित होते. या चर्चेनंतर सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व जिल्हा बॅँकांना बलुतेदार संस्थांच्या कर्ज माफीचे पैसे देण्याचा निर्णय घेतला. जिल्हा बॅँकेस यामुळे ३ कोटी ८७ लाखाचा निधी मिळणार असल्याचे अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर यांनी सांगितले. --------नोकर भरतीचा लवकरच निर्णय जिल्हा बॅँकेने ५०० कर्मचार्‍यांच्या नियुक्तीचा निर्णय घेतला असून तसा प्रस्ताव राज्याच्या सहकार विभागाला पाठविला होता. मात्र त्यावर अद्याप निर्णय न झाल्याने या बैठकीत पहिल्या टप्प्यात २०० कर्मचारी नियुक्तीची परवानगी मिळावी अशी विनंती करण्यात आली. त्यावरही सकारात्मक निर्णयाचे आश्वासन सहकार मंत्र्यांनी दिले. येत्या कॅबिनेट मध्ये त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. ----कोटबॅँकेचे संगणकीकरण आता आटोपत आले असून नवीन कर्मचारी वर्ग मिळाल्यास संगणक विषयातील तज्ज्ञांना शाखांवर देता येईल व बॅँकेच्या कामांना यामुळे गती मिळेल. -रोहिणी खडसे-खेवलकर, अध्यक्षा, जिल्हा बॅँक.