नवी दिल्ली: महाराष्ट्रासह चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 35 टक्के आमदारांची तिकिटे कापण्याची तयारी केली आहे. जुन्यांना हटवत नव्या चेह:यांना स्थान देतानाच महिलांना योग्य प्रतिनिधित्व देण्याची रणनीती आखत काँग्रेस निवडणुकीला सामोरा जाणार आहे.
काँग्रेसने गोपनीय अहवालाचा आधार घेत सावध पावले उचलण्याचे ठरविले आहे. विविध राज्यांमधील सव्रेक्षण पार पाडल्यानंतर काँग्रेसश्रेष्ठींना हा अहवाल सुपूर्द करण्यात आला. महाराष्ट्र, हरियाणा, जम्मू-काश्मीर आणि झारखंडमधील उमेदवारांची निवड केवळ जिंकण्याच्या शक्यतेच्या आधारावर केली जाईल.
निवडून येऊ शकणा:या उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी विविध स्तरातून अहवाल मागविण्याचे काम सुरू आहे. अनेक तिकिटे मागणा:या नेत्याची विस्तृत शहानिशा केली जावी. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मत जाणून घेण्याला महत्त्व दिले जावे. विद्यमान आमदार असल्यामुळे त्यालाच उमेदवारी देणो गरजेचे नाही, असे ठामपणो सांगण्यात आले आहे.
आवश्यकता असेल तर कोणत्याही दबावाखाली न येता विद्यमान आमदाराचे तिकीट कापले जावे, असा आदेश पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी निवड समितीतील नेत्यांना दिला आहे. (विशेष प्रतिनिधी)
4लोकसभा निवडणुकीत उमेदवारांची निवड योग्यरीत्या न झाल्यामुळे पराभव पत्करावा लागला. विधानसभा निवडणुकीत अशा प्रकारची कोणतीही तडजोड केली जाऊ नये, असे पक्षश्रेष्ठींना वाटते. वाईट प्रतिमा असलेल्यांना कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी देऊ नये.
4गेल्या निवडणुकीत 2क् हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभूत झालेल्या उमेदवाराच्या अर्जाचाही विचार केला जाऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले. अलीकडेच पक्षश्रेष्ठींना सोपविण्यात आलेल्या गोपनीय अहवालानुसार 35 टक्के आमदारांना बाहेरचा रस्ता दाखविला जाण्याची प्रबळ शक्यता असल्याचे सूत्रंनी सांगितले.