शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

सक्तीने लग्न लावण्यासाठी ३,४०० तरुणांचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 04:17 IST

मुलीच्या लग्नात हुंडा द्यावा लागू नये किंवा हुंडा देणे शक्य नसल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी उपवर तरुणास पळवून आणून त्याचा सक्तीने विवाह लावण्याची ‘पाकदुआ विवाहा’ची कुप्रथा बिहारमध्ये रुढ असून गेल्या वर्षी अशा प्रकारे ३,४०० हून अधिक तरुणांचे अपहरण करण्यात आले.

पाटणा : मुलीच्या लग्नात हुंडा द्यावा लागू नये किंवा हुंडा देणे शक्य नसल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी उपवर तरुणास पळवून आणून त्याचा सक्तीने विवाह लावण्याची ‘पाकदुआ विवाहा’ची कुप्रथा बिहारमध्ये रुढ असून गेल्या वर्षी अशा प्रकारे ३,४०० हून अधिक तरुणांचे अपहरण करण्यात आले.पाटणा जिल्ह्यातील एका गावात गेल्या महिन्यात एका इंजिनीअरचे अपहरण करून त्याचा अशा प्रकारे ‘पाकदुआ विवाह’ लावण्यात आला. मात्र त्याने सक्तीने गळ््यात मारलेल्या या पत्नीला सोबत सासरी नेण्यास नकार दिल्याने ही प्रथा माध्यमांपुढे आली.वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने सरकारी आकडेवारीचा हवाला देत सांगितले की, ‘पाकदुआ विवाहा’ची प्रथा बिहारमध्ये रुढ आहे. गेल्या वर्षी सक्तीने विवाह लावण्यासाठी ३,४०५ तरुणांचे अपहरण केल्याची नोंद आहे. यापैकी बहुतांश प्रकरणात तरुणास व त्याच़्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली.बिहारमध्ये अशा दररोज सरासरी नऊ ‘पाकदुुआ विवाह’ लावले जातात. सन २०१६ मध्ये ३,०७०, सन २०१५ मध्ये ३,००० व सन २०१४ मध्ये २,५२६ तरुणांचे अपहरण केले गेले होते, असे आकडेवारीवरून दिसते. बिहारमध्ये हुंड्याची प्रथा अजूनही कायम आहे. ज्या मुलीच्या कुटुंबाची हुंडा देण्याची ऐपत नाही किंवा हुंडा देण्याची इच्छा नाही असे वधुपिता आसपासच्या गावांमध्ये एखादा तरुण हेरतात व त्याचे अपहरण करून धाकधपटशाने त्याचे लग्न मुलीशी लावले जाते. मुलाची माहिती काढण्यासाठी नातेवाईक व परिचितांची मदत घेतली जाते. लग्नासाठी नवरामुलगा पळवून आणणाºया गुन्हेगारी टोळ््याही आहेत.अपहरण करून विवाह लावल्याचे प्रत्येक प्रकरण पोलिसांकडे नोंदले जातेच असे नाही. पण तरुणांच्या अपहरणाच्या घटनांची कुप्रथेशी सांगड घातली की विदारक चित्र समोर येते.‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड््स ब्युरो’ने प्रसिद्ध केलेल्या २०१५ च्या ताज्या आकडेवारीतही याचे स्वच्छ प्रतिबिंब दिसते. त्या आकडेवारीनुसारसन २०१५ मध्ये बिहारमध्ये १८ ते ३० या वयोगटातील तरुणांच्या अपहरणाचे १,०९६ गुन्हे नोंदले गेले होते. संपूर्ण देशात सर्वाधिक म्हणजे १७ टक्के अशा घटना बिहारमध्ये घडल्या होत्या. (वृत्तसंस्था)>पोलिसांना सतर्कतेचे आदेशहुंडा हे ‘पाकदुआ विवाहा’चे मूळ कारण आहे. सरकारलाही याची जाणीव असल्याने मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी संपूर्ण दारूबंदीनंतर हुंडाबंदीसाठी मोठी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. आता लग्नांचा हंगाम सुरु होईल. त्यावेळी अशा घटनांना आवर घालण्यासाठी बारकाईने लक्ष ठेवून कारवाई करण्याचे निर्देश सर्व जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले गेले आहेत.>‘पाकदुआ विवाह’हे बिहारचे जुने सामाजिक दुखणे आहे. गेल्या काही वर्षांत यात सतत वाढ होत आहे, ही चिंतेची बाब आहे. - महेंद्र यादव,कोशी खोºयातील सामाजिक कार्यकर्ते