शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
2
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
3
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
4
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
5
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
6
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
7
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
8
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
9
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
10
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
11
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
12
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
13
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
14
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
15
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
16
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
17
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
18
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
19
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
20
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी

CoronaVirus News: चिंता वाढली! सहा महिन्यांत तीनपैकी एका कोरोनामुक्तास भेडसावू लागते 'ही' गंभीर समस्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 07:48 IST

CoronaVirus News: लॅन्सेट अहवालातील माहिती; २ लाख ३० हजारांहून अधिक जणांच्या आरोग्याच्या घेतल्या नोंदी

मुंबई : देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून, राज्यातील कोरोनारुग्णांची संख्या देशात सर्वाधिक आहे. काेराेनामुक्तांच्या सर्वेक्षणानंतर धक्कादायक माहिती समाेर आली आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर सहा महिन्यांत तीनपैकी एकाला मेंदूविकाराशी निगडित (न्यूरॉलॉजिकल) किंवा मानसिक समस्या निर्माण झाल्याचे निदर्शनास आले आहे.कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या न्यूरॉलॉजिकल आणि मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो, याचा अभ्यास या सर्वेक्षणातून करण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर लॅन्सेट सायकायट्री जर्नलमध्ये याबाबत अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, कोरोनामुक्त झालेल्या २ लाख ३० हजारांहून अधिक लोकांच्या आरोग्याच्या नोंदी घेण्यात आल्या. त्यापैकी ३४ टक्के लोकांना सहा महिन्यांत मेंदूविकाराशी निगडित न्यूरॉलॉजिकल किंवा मानसिक समस्यांनी ग्रासले होते. १७ टक्के लोक अत्यंत चिंताग्रस्त, तर १४ टक्के लोकांमध्ये मूड डिसऑर्डरबाबतची लक्षणे आढळून आली. मनोविकाराशी कोरोनाचा काय संबंध आहे याबाबत अद्यापही स्पष्ट माहिती मिळालेली नाही; पण कोरोनामुक्त झालेल्या लोकांमध्ये चिंता आणि नैराश्य या दोन गोष्टी प्रामुख्याने आढळून आल्या, असे निरीक्षण संशोधकांनी नाेंदवले.या सर्वांमध्ये स्ट्रोक, स्मृतिभ्रंश, न्यूरॉलॉजिकल डिसऑर्डरसारखी लक्षणेही आढळली; पण या लक्षणांचे प्रमाण कमी आहे.  साधारणतः तीनपैकी एका कोरोनामुक्त व्यक्तीत असे आजार उद्भवत असल्याचे दिसून आले आहे.मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. आस्था दासानी यांनी सांगितले की, मुंबईतही अशा स्वरूपाच्या तक्रारी असणाऱ्या काही नोंदी आहेत. मुख्यतः मेंदूतील न्यूरो केमिकल्स कोरोनाची लागण झाल्यावर बदलतात, त्यामुळे मेंदूविकाराचा धोका अधिक जाणवतो. त्याचप्रमाणे, काही ज्येष्ठ नागरिकांच्या प्रकृतीवर याचा खोलवर परिणाम झालेला असून यामुळे वागणुकीतही बदल दिसून येत असल्याचे रुग्णांच्या कुटुंबीयांनी सांगितले.मानसिक समस्यांचे प्रमाणही चिंताजनककोविडचा संसर्ग झाल्यानंतर किंवा पोस्ट कोविडच्या फेझमध्येही रुग्णांमध्ये मानसिक समस्यांचे प्रमाण वाढत असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. बऱ्याचदा कोविडशी निगडित शारीरिक व्याधींवर उपचार केले जातात, त्यासाठी रुग्ण किंवा नातेवाईक आग्रही असतात. परंतु, मानसिक समस्यांकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जाते. याविषयी, जनजागृतीचा अभाव असल्यानेही अनेकदा रुग्ण पुढाकार घेत नाहीत. मात्र यात कोणताही कमीपणा नसून हे उपचार किंवा मानसिक समस्यांच्या मुक्तीकडे टाकलेले सकारात्मक पाऊल आहे. अशा समस्या भेडसावत असल्यास रुग्ण किंवा कुटुंबीयांनी पुढाकार घ्यावा.                      - डॉ. मालिनी अग्रवाल, मानसोपचारतज्ज्ञ

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या