शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रासह ३२ राज्यांनी नाही दिला स्मार्ट सिटीचा निधी

By admin | Updated: March 31, 2017 01:12 IST

देशभरातील १०० स्मार्ट सिटीसाठी सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट सिटी योजनेत राज्य सरकारांचे स्वारस्य कमी होत

नितीन अग्रवाल/ नवी दिल्ली देशभरातील १०० स्मार्ट सिटीसाठी सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट सिटी योजनेत राज्य सरकारांचे स्वारस्य कमी होत असल्याचे दिसून येत आहे. भलेही केंद्र सरकार या योजनांमध्ये कोणत्याही प्रकारचा दुर्लक्षितपणा असल्याचा इन्कार करीत आहे; पण वस्तुस्थिती ही आहे की, महाराष्ट्रासह १८ राज्यांनी ३२ स्मार्ट शहरांसाठी आपल्या वाट्याची रक्कमच दिलेली नाही. विशेष म्हणजे यात अनेक भाजपशासित राज्यांचा समावेश आहे. शहरी विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मार्ट सिटी योजनेंतर्गत आतापर्यंत निवडण्यात आलेल्या ४० शहरांपैकी ३२ शहरांसाठी राज्य सरकारच्या वतीने आपल्या वाट्याचा निधी दिलेला नाही. आपल्या वाट्याचा निधी न देणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र, मध्यप्रदेश, पंजाब, छत्तीसगढ, गुजरात, हरियाणा, राजस्थान, झारखंड, हिमाचल, तेलंगणा, त्रिपुरा, केरळ, बिहार, आसाम आणि आंध्र प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. दिल्ली, चंदीगड आणि अंदमान-निकोबार बेट समूह यासारख्या केंद्रशासित प्रदेशांनीही आपल्या वाट्याचा निधी दिला नाही. शिवसेनेचे सदस्य राहुल शेवाळे यांनी विचारलेल्या प्रश्नावर मंत्र्यांनी आज सांगितले की, सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापन प्रणालीनुसार (पीएफएमएस) राज्यांच्या वाट्याच्या निधीबाबत निगराणी केली जाते. ही योजना संथ चालू असल्याच्या प्रश्नाबाबतही त्यांनी नकार दिला. व्यंकय्या नायडू यांनी सांगितले की, ३१ मार्च रोजी तिसऱ्या टप्प्यातील स्मार्ट शहरांचे प्रस्ताव दिले जातील. याच्या मूल्यांकनासाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागेल. केंद्र आणि राज्य सरकारकडून चालविण्यात येणाऱ्या स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत केंद्र सरकारकडून प्रत्येक स्मार्ट शहरासाठी पाच वर्षांपर्यंत प्रत्येक वर्षी सुमारे १०० कोटी रुपये देण्याची तरतूद आहे. उर्वरित रक्कम राज्य सरकार देणार आहे.‘त्या’ राज्यांनी नाही दिला वाटाज्या राज्यांनी आपल्या वाट्याचा निधी दिला नाही त्यात बहुतांश भाजपशासित राज्ये आहेत. यात महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, मध्यप्रदेश, हरियाणा, राजस्थान, झारखंड, गुजरात आणि आसाम या राज्यांचा समावेश आहे.