शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा दलाची मोठी कारवाई, चकमकीत ३१ ठार, अनेक स्वयंचलित शस्त्रे जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 16:38 IST

Bijapur Naxal Encounter: बिजापूरमध्ये नक्षलविरोधी कारवाईदरम्यान सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. यामध्ये आतापर्यंत ३१ नक्षलवादी मारले गेले आहेत.

Bijapur Naxal Encounter:  छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये नक्षलविरोधी मोहीम सुरु आहे. येथे रविवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत ३१ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर चार जवानही चकमकीत गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दोन जवानांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समजते.

बिजापूरमध्ये नक्षलविरोधी कारवाईदरम्यान सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. यामध्ये आतापर्यंत ३१ नक्षलवादी मारले गेले आहेत. हे सर्व ३१ माओवादी वर्दीत होते. मृत नक्षलवाद्यांची ओळख पटवली जात आहे. दरम्यान, नक्षलवाद्यांवर बऱ्याच दिवसांपासून कारवाई केली जात आहे. गेल्या ४० दिवसांत सुरक्षा दलांनी ५६ नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. तसेच, बिजापूरच्या इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरात नक्षलवाद्यांचा शोध सुरू आहे.

यावर्षी आतापर्यंत चार मोठ्या नक्षलवादी कारवाया करण्यात आल्या आहेत. यामध्ये पहिल्या चकमकीत ५, दुसऱ्या चकमकीत १२, तिसऱ्या चकमकीत ८ नक्षलवादी मारले गेले आणि आज ३१ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. म्हणजेच गेल्या ४० दिवसांत सुरक्षा दलांनी ५६ नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. हे सर्व नक्षलवादी बिजापूरच्या राष्ट्रीय उद्यानात बस्तर एरिया कमिटीच्या कार्यकर्त्यांविरुद्धच्या कारवाईत मारले गेले आहेत. 

१४ महिन्यांत २७४ नक्षलवादी ठारसुरक्षा दल गेल्या एक वर्षापेक्षा जास्त काळापासून नक्षलवाद्यांवर कारवाई करत आहेत. गेल्या १४ महिन्यांत छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी २७४ नक्षलवादी मारले आहेत. याशिवाय ११६६ जणांना अटक करण्यात आली आहे. तर ९६९ जणांनी आत्मसमर्पण केले आहे. सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये ज्या ठिकाणी चकमक झाली, ते ठिकाण बिजापूर जिल्ह्यातील फरसेगड परिसर आहे. येथील राष्ट्रीय उद्यानाचे जंगल नक्षलवाद्यांचा सक्रिय गड मानले जाते. 

अनेक स्वयंचलित शस्त्रे जप्तबिजापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यानात बस्तर एरिया कमिटी क्षेत्रातील जंगलात नक्षलवाद्यांविरोधात डीआरजी, एसटीएफ आणि बस्तर फायटर्स यांनी संयुक्तरित्या कारवाई केली. या कारवाईत ठार झालेल्या नक्षलवाद्यांकडून अनेक स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. चकमकीच्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात एके ४७, एसएलआर, आयएनएएसएएस रायफल, ३०३, बीजीएल लाँचर शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. तसेच, पुन्हा कारवाईसाठी अतिरिक्त दल पाठवण्यात आले असून शोध मोहीम सुरूच आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीChhattisgarhछत्तीसगड