शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

३०० किमी लांब शत्रूचे विमान पाडणार; घातक युद्धनाैका मुरगाव आज हाेणार नाैदलात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 06:23 IST

ब्रह्माेससह इस्रायली रडारने सुसज्ज. भारतीय नौदलाच्या ‘वॉरशिप डिझाईन ब्युरो’ने युद्धनौकेचे डिझाईन तयार केले गेले असून, माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई यांनी तिची बांधणी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : स्वदेशी बनावटीची युद्ध नौका आयएनएस मुरगाव रविवारी भारतीय नौदलात दाखल होणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत मुंबईतील नौदल गोदीत हा सोहळा होईल. क्षेपणास्त्र विनाशिका प्रकारातील या नौकेमुळे भारतीय नौदलाचे सामर्थ्य वाढण्यासह देशाच्या सागरी सीमांची सुरक्षा अधिक भक्कम होईल, असे संरक्षण मंत्रालयाने सांगितले.  

भारतीय नौदलाच्या ‘वॉरशिप डिझाईन ब्युरो’ने युद्धनौकेचे डिझाईन तयार केले गेले असून, माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई यांनी तिची बांधणी केली आहे. या नौकेला ‘मुरगाव’ या गोव्यातील ऐतिहासिक बंदर शहराचे नाव देण्यात आले आहे. पोर्तुगीज राजवटीतून गोव्याच्या मुक्ततेस ६० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या युद्धनौकेचे गेल्या वर्षी १९ डिसेंबर रोजी जलावतरण करण्यात आले होते. 

आयएनएस मुरगाव१६३मीटर लांबी  १७मीटर रुंदी  ७४०० टन वजन  nचार शक्तिशाली गॅस टर्बाइनने सुसज्ज nवेग- ३० नॉट्सहून (समुद्री मैल) अधिक

nब्रह्मोस आणि बराक-८ सारख्या क्षेपणास्त्रांनी सज्जnइस्रायलचे एम-स्टार रडारnहवेतील लांब पल्ल्याचे लक्ष्य रडार शोधू शकते. n१२७ मिमी तोफ nसुपर रॅपिड गन माउंटn७० कि.मी. अंतरापर्यंत हवेतील विमानाला करू शकते लक्ष्यnजमिनीवरील ३०० कि.मी.पर्यंतच्या लक्ष्याचा वेध शक्य nक्षेपणास्त्रविरोधी एके-६३० तोफ प्रणाली nपाणबुडीविरोधी रॉकेट लाँचर 

आण्विक, जैविक आणि रासायनिक युद्धांदरम्यानही बचाव करण्यास आयएनएस मुरगाव सक्षम आहे. खराब वातावरणातही हेलिकॉप्टर लँड होऊ शकतात. 

टॅग्स :indian navyभारतीय नौदल