शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

भारतात ३० कोटी लोक दारिद्र्यात!

By admin | Updated: February 6, 2015 01:41 IST

गेल्या अनेक दशकांपासून दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम राबविला जात असला तरी भारतात सुमारे ३० कोटींहून अधिक लोक अद्याप अत्यंत गरिबीचे जीवन जगत आहेत.

विकास असंतुलित : युनोच्या अहवालातील माहितीनवी दिल्ली : गेल्या अनेक दशकांपासून दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम राबविला जात असला तरी भारतात सुमारे ३० कोटींहून अधिक लोक अद्याप अत्यंत गरिबीचे जीवन जगत आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, संयुक्त राष्ट्र संघटनेचा २००० मध्ये लागू झालेला मिलेनिअम डेव्हलपमेंट गोल अर्थात एमडीजी कार्यक्रम डिसेंबर २०१५ मध्ये समाप्त होत आहे. यात गरिबी निर्मूलन हे एक महत्त्वाचे लक्ष्य आहे.सरकारी आकडेवारीनुसार, भारताची लोकसंख्या १२५ कोटींहून अधिक आहे. विविध देशांनी २००० मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेचा मिलेनिअम डेव्हलपमेंट गोल कार्यक्रम लागू केला होता. यात देशातील गरिबीचे प्रमाण २०१५ पर्यंत अर्ध्यावर आणण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते. आठ सूत्री कार्यक्रमात निरक्षरता, लिंग समानुभाव व महिला सक्षमीकरण, बाल मृत्यूदरात घट तथा माता आरोग्य सुधार या लक्ष्यांचाही समावेश आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या एका अहवालात ३० कोटी लोक अद्याप पराकोटीच्या गरिबीत जीवन जगत असल्याचे म्हटले आहे.संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आशिया-पॅसिफिक भागासाठी आर्थिक व सामाजिक आयोगाचे कार्यकारी सचिव शमशाद अख्तर यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, भारताने एमडीजीबाबत उल्लेखनीय प्रगती केली आहे. मात्र, आत्ममुग्ध होण्याची कोणतीही गरज नाही. व्यापक संधी आहेत आणि मिळविण्यासाठी खूप जागा आहे. चालू वर्षअखेरीस एमडीजीचा कालावधी समाप्त होत आहे. यानंतरच शाश्वत विकास लक्ष्य कार्यक्रमाची अंमलबजावणी होऊ शकेल.अहवालात म्हटले की, भारताकडे शाश्वत विकासात अग्रणीवर राहण्याची संधी आहे. भारताने दारिद्र्य निर्मूलन लक्ष्य गाठले आहे. मात्र, यात अद्याप बरीच आघाडी घ्यावी लागणार आहे. भारताची प्रगती असमतोल आहे. मिलेनिअम डेव्हलपमेंट गोलचा कालावधी संपल्यानंतर संयुक्त राष्ट्र संघटनेकडून शाश्वत विकास लक्ष्य अर्थात एसडीजी कार्यक्रम लागू केला जाणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)च्भारताने संयुक्त राष्ट्रात सांगितले की, २०१५ नंतर विकासाच्या अजेंड्यात गरिबी निर्मूलन तथा बाल संगोपनाच्या गरजेवर भर दिला पाहिजे. तरुणांना संरक्षण तथा चांगल्या जीवनमानासाठी चांगले वातावरण मिळू शकेल. युनोतील भारताचे स्थायी प्रतिनिधी भगवंत बिश्नोई यांनी युनिसेफच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत याकडे लक्ष वेधले. च्जगभरात ५६.८ कोटी मुले अजूनही अत्यंत गरिबीचे जीवन जगत आहेत. या मुलांच्या कल्याणासाठी भरघोस गुंतवणूक आवश्यक असून आर्थिक संकट, नैसर्गिक आपत्ती व सशस्त्र संघर्ष यामुळे त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होते. बिश्नोई यांनी भारतात अलीकडेच सुरू करण्यात आलेल्या ‘मुलीला वाचवा, मुलीला शिकवा’ कार्यक्रमाचाही उल्लेख केला. उल्लेखनीय बाब म्हणजे युनिसेफचे भारतात सर्वाधिक काम आहे.