शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

३ बंगले, कार अन् व्याजाचा धंदा; 'त्या' भिकाऱ्याची संपत्ती पाहून पोलीसही चक्रावले! व्यापाऱ्यांना देत होता कर्ज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 13:57 IST

सराफा बाजारात गेली अनेक वर्षे भीक मागणाऱ्या मांगीलाल नावाच्या भिकाऱ्याचा रॉयल थाट उघड झाला असून, त्याच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता असल्याचे समोर आले आहे.

आपण अनेकदा रस्त्यावर बसलेल्या भिकाऱ्यांकडे सहानुभूतीने पाहतो आणि त्यांना चार दोन पैसे देतो. मात्र, मध्य प्रदेशातील इंदूरमधून समोर आलेली बातमी वाचून तुमचा भिकाऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल. सराफा बाजारात गेली अनेक वर्षे भीक मागणाऱ्या मांगीलाल नावाच्या भिकाऱ्याचा रॉयल थाट उघड झाला असून, त्याच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता असल्याचे समोर आले आहे.

भीक मागून कमावले ३ बंगले आणि कार

महिला व बालविकास विभागाने इंदूरमध्ये राबवलेल्या 'भिक्षावृत्ती निर्मूलन मोहिमे'त मांगीलालची पोलखोल झाली. दिसायला अत्यंत गरीब आणि हतबल वाटणाऱ्या मांगीलालकडे शहरात एक-दोन नव्हे तर तब्बल ३ पक्की घरे आहेत. त्याच्याकडे भगतसिंग नगर भागात १६ बाय ४५ फुटांचे तीन मजली आलिशान घर, शिवनगरमध्ये ६०० स्क्वेअर फुटांचे दुसरे पक्के घर आणि अलवासमध्ये १० बाय २० फुटांचे १-बीएचके घर, जे त्याला अपंगत्वाच्या कोट्यातून मिळाले होते, इतकी स्थावर संपत्ती आहे.

इतकेच नाही, तर या 'धनकुबेर' भिकाऱ्याकडे ३ रिक्षा आहेत, ज्या तो भाड्याने चालवतो. धक्कादायक म्हणजे, त्याच्याकडे एक डिझायर कार असून ती चालवण्यासाठी त्याने चक्क ड्रायव्हर देखील ठेवला आहे.

व्यापाऱ्यांना व्याजाने देतो पैसे

मांगीलालची मोडस ऑपरेंडी पाहून अधिकारीही अवाक झाले. पाठीवर बॅग आणि हातात बूट घेऊन लोकांची सहानुभूती मिळवणारा हा भिकारी दिवसाला ५०० ते १००० रुपये भीक मिळवत असे. चौकशीत त्याने कबूल केले की, भीक मागून जमा झालेले पैसे तो सराफा बाजारातील काही व्यापाऱ्यांना व्याजाने देतो. तो दररोज किंवा साप्ताहिक तत्त्वावर कर्ज वाटप करायचा आणि रोजचे व्याज वसूल करण्यासाठी पुन्हा भिकाऱ्याच्या वेशात सराफा बाजारात फिरायचा.

इंदूरमध्ये ६,५०० भिकाऱ्यांचा सुळसुळाट

जिल्हा कार्यक्रम अधिकारी रजनीश सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२४ पासून इंदूरला भिक्षावृत्तीमुक्त करण्यासाठी मोहीम राबवली जात आहे. सुरुवातीच्या सर्वेक्षणात शहरात तब्बल ६,५०० भिकारी आढळले होते. त्यापैकी ४,५०० जणांचे समुपदेशन करून त्यांना या कामापासून परावृत्त करण्यात आले आहे, तर १६०० जणांना सेवाधाम आश्रमात पाठवण्यात आले आहे. मांगीलालसारख्या व्यावसायिक भिकाऱ्यांमुळे गरजू आणि खऱ्या भिकाऱ्यांकडे पाहण्याची समाजाची दृष्टी मलिन होत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. अशा टोळ्यांवर आता कडक कारवाई केली जाणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Beggar's shocking wealth: Three houses, car, and lending business revealed.

Web Summary : An Indore beggar, Mangi Lal, owns three houses, a car, and lends money to traders. He earns ₹500-₹1000 daily begging and gives loans at interest. Authorities are cracking down on professional beggars exploiting the needy.
टॅग्स :BeggerभिकारीMadhya Pradeshमध्य प्रदेश