शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान शहीद, सर्च ऑपरेशन सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 10:23 IST

कुलगाम जिल्ह्यातील हलान जंगल परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला घेराव घातला आणि शोध मोहीम सुरू केली.

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात शुक्रवारी दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत लष्कराचे 3 जवान शहीद झाले आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील हलान जंगल परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला घेराव घातला आणि शोध मोहीम सुरू केली. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्यानंतर शोध मोहिमेचे चकमकीत रूपांतर झाले, जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. 

दहशतवाद्यांसोबत झालेल्या गोळीबारात सुरक्षा दलाचे तीन जवान जखमी झाले असून उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. श्रीनगरस्थित लष्कराच्या चिनार कोर (Chinar Corps) एका ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'ऑपरेशन हलन कुलगाम. कुलगाममधील हलानच्या उंच भागात दहशतवादी असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी 4 ऑगस्ट रोजी कारवाई सुरू केली. 

दहशतवाद्यांसोबत झालेल्या गोळीबारात तीन जवान जखमी झाले आणि नंतर शहीद झाले. सध्या शोधमोहीम सुरू आहे. लष्कर अधिकाऱ्याने सांगितले की, चकमकीच्या ठिकाणी आणखी फौजा पाठवण्यात आल्या असून शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे. यापूर्वी, काश्मीरमधील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाची शाखा 'द रेजिस्टेन्स फ्रंट' (TRF) या दहशतवाद्यांच्या तीन साथीदारांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामुल्ला येथील इम्रान अहमद नजर, श्रीनगर येथील वसीम अहमद मट्टा आणि बिजबेहारा येथील वकील अहमद भट अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलीस प्रवक्त्याने सांगितले की, तिघांनाही पोलीस पथकाने विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे चेक पोस्टवरून पकडले. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून तीन हातबॉम्ब, पिस्तूल, एके-47 रायफल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानterroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीर