शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

29 टक्के पुरुषांना स्वतःच्या पत्नीवर विश्वास नाही- सर्व्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 18:35 IST

राष्ट्रीय कुटुंब कल्याण सर्वेक्षणातून झारखंडमधल्या स्थितीवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.

- एस. पी. सिन्हारांची- राष्ट्रीय कुटुंब कल्याण सर्वेक्षणातून झारखंडमधल्या स्थितीवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. झारखंडमधल्या 29 टक्के पुरुषांना स्वतःच्या पत्नीवर विश्वास नाही, हे सर्वेक्षणातून समोर आलं आहे. गर्भनिरोधक साधनांचा वापर करणा-या महिलांचे संबंध अनेक पुरुषांशी असल्याचीही शक्यता या पुरुषांनी वर्तवली आहे. 60 टक्के विवाहित महिला आणि पुरुष गर्भनिरोधक साधनांचा वापर करत नसल्याचंही या सर्व्हेतून स्पष्ट करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या सर्वेक्षणातून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. 

झारखंडच्या उर्वरित भागात 40 टक्के प्रकरणांमध्ये गर्भनिरोधक उपायांचा वापर केला जातोय. शहरी भागात याचं प्रमाण 47 टक्क्यांच्या आसपास आहे. तर ग्रामीण भागात 38 टक्के माणसं या साधनांचा वापर करतात. खरं तर 15 ते 49 वर्षं वयाच्या 56 टक्के पुरुषांच्या मते, गर्भनिरोधक साधनं ही पुरुषांऐवजी महिलांनी वापरली पाहिजेत. गर्भनिरोधक उपायांच्या प्रकरणात 77 टक्के महिला नसबंदी करतात. गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर तीन टक्के महिला करतात, तर पुरुषांचं नसबंदीचा प्रमाण हे 0.2 टक्क्यांच्या जवळपास आहे. 15 ते 19 वर्ष वयाची 93 टक्के महिला आणि 98 टक्के पुरुष कोणत्याही प्रकारच्या गर्भनिरोधक साधनांचा वापर करत नाहीत. त्यामुळे लहान वयात मुलींच्या नशिबी मातृत्व येते. झारखंडमध्ये 17 वर्षांच्या 5 टक्के, 18 वर्षांच्या 13 टक्के आणि 19 वर्षांच्या 26 टक्के महिला पहिल्या मुलाला जन्म देतात. सर्वेक्षणानुसार, 38 टक्के मुलींचं लग्न हे कमी वयात असतानाच होते. वय वर्षं 15-19च्या विवाहित महिलांमध्ये 19 टक्के महिला मातृत्व धारण करतात. 15 ते 19 वर्षांच्या वयात 7 टक्के माणसं गर्भनिरोधक साधनांचा वापर करतात. 12वी किंवा त्याहून जास्त शिकलेल्या महिलांमध्ये नसबंदी करण्याचं प्रमाण 37 टक्के आहे. तर कधीही शाळेत न गेलेल्या महिलांमध्ये हे प्रमाण 16 टक्के आहे. महिलांची वंशाच्या दिव्याला जन्म देण्यासाठी प्राथमिकता आहे.

टॅग्स :Womenमहिला