२९... गुन्हे... जोड... ०३
By admin | Updated: January 29, 2015 23:17 IST
दुचाकी स्लीप झाल्याचे तरुणाचा मृत्यू
२९... गुन्हे... जोड... ०३
दुचाकी स्लीप झाल्याचे तरुणाचा मृत्यूरामटेक : भरधाव मोटरसायकल स्लीप झाल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामटेक -तुमसर मार्गावरील शिवनी (भोंडकी) शिवारात बुुधवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली.झामसिंग भैयालाल लिल्लारे (३५, रा. परसवाडा, मध्य प्रदेश) असे मृत तरुणाचे नाव आहे. झामसिंग हा मागील काही वर्षांपासून रामटेक तालुक्यातील दुधाळा (कवडस) येथे राहायचा. तो एमएच-४०/एजी-२५७८ क्रमांकाच्या मोटरसायककलने शिवनीहून किरणापूर (रामटेक)कडे भरधाव जात होता. दरम्यान, शिवनी (भोंडकी) शिवारात मोटरसायकल स्लीप झाली आणि तो खाली कोसळला. यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या प्रकरणी रामटेक पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. सदर घटनेचा तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र कश्यप करीत आहे. (प्रतिनिधी)***