शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
5
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
6
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
7
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
8
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
9
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
10
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
11
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
12
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
13
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
14
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
15
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
16
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
17
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
18
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
19
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
20
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!

27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 21:58 IST

भारतातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम वेगाने सुरू आहे. 100 किमी लांबीचा पूल झाला असून, पुढील 250 किमीसाठी खांब उभारण्यात आले आहेत.

Bullet Train India : भारतातील पहिली बुलेट ट्रेनमुंबई-अहमदाबाद, या दोन शहरादरम्यान धावणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम वेगाने सुरू आहे. यामध्ये 100 किमी लांबीचा पूल पूर्ण झाला असून, पुढील 250 किमीसाठी खांब उभारण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, अवघ्या 6 महिन्यांत नवी मुंबईतील 394 मीटर लांबीच्या बोगद्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, घणसोली येथे अतिरिक्त मध्यवर्ती बोगदा (ADIT) पूर्ण झाल्यामुळे महाराष्ट्रातील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि शिळफाटा दरम्यान 21 किमी लांबीच्या बोगद्याच्या बांधकामाला गती मिळेल.

पीएम मोदींनी केला शुभारंभपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी 14 सप्टेंबर 2017 रोजी अहमदाबादमध्ये या प्रकल्पाचा शुभारंभ केला होता. या प्रकल्पाला मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल कॉरिडॉर असे नाव देण्यात आले आहे. बुलेट ट्रेनसाठी बोगद्याचे खोदकाम 6 डिसेंबर 2023 रोजी सुरू झाले होते. विशेष म्हणजे, या बुलेट ट्रेन प्रकल्पाची किंमत तब्बल 1.08 लाख कोटी रुपये आहे. प्रकल्पाच्या सुरुवातीला बुलेट ट्रेनमध्ये 750 लोक बसू शकतील, नंतर 1200 लोकांसाठी 16 डबे जोडले ताली.

508 किमीचा प्रवास 3 तासात पूर्ण होणार मुंबई-अहमदाबाद दरम्यान धावणारी बुलेट ट्रेन 508 ​​किलोमीटरचे अंतर अवघ्या तीन तासात पूर्ण करेल. सध्या सामान्य ट्रेनने मुंबई-अहमदाबाद हे अंतर 7-8 तासांचे आहे. ट्रेनचा सरासरी वेग 254 किमी/तास असेल. तसेच, बुलेट ट्रेनच्या मार्गावर 12 स्थानके असतील. यात मुंबई, ठाणे, विरार, भोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती आहेत. मुंबई स्टेशन भूमिगत असेल. 

खोदकामासाठी 27515 किलो स्फोटकांचा वापरनॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ADIT 26 मीटर झुकलेला असून, याला बनवण्यासाठी 27515 किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला होता. 214 वेळा ब्लास्टिंग करुन हा बोगदा तयार करण्यात आला आहे. यासाठी नॉन-इलेक्ट्रिक डिटोनेटर्सचाही वापर करण्यात आला. यावेळी आग लागण्याची शक्यता टाळण्यासाठी विनाविद्युत उपकरणे लावण्यात आली. कर्मचारी आणि कामगारांसह एकूण 100 लोक या ठिकाणी सातत्याने काम करत आहेत. 

बोगद्याचा 7 किमीचा भाग समुद्राखालून जाणार या प्रकल्पात एकूण 21 किलोमीटर लांबीचा बोगदा बांधण्यात येणार आहे. यामध्ये बोअरिंग मशिनच्या साह्याने 16 किलोमीटर खोदकाम करण्यात येईल, तर 5 किलोमीटरचा बोगदा न्यू ऑस्ट्रियन टनेलिंगद्वारे बांधला जाणार आहे. विशेष म्हणजे, या बोगद्याचा सुमारे सात किलोमीटर भाग ठाणे खाडीतील समुद्राखालून जाणार आहे. सध्या बीकेसी, विक्रोळी आणि घणसोलीजवळ सावली येथे 3 शाफ्टचे बांधकाम सुरू आहे. हे शाफ्ट टनेल बोरिंग मशीन्स (TBM) वापरुन 16 किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्यात मदत करतील.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनIndian Railwayभारतीय रेल्वेMumbaiमुंबईahmedabadअहमदाबाद