२७... सारांश
By admin | Updated: December 27, 2014 23:38 IST
जि.प. शाळेत सामान्य ज्ञान स्पर्धा
२७... सारांश
जि.प. शाळेत सामान्य ज्ञान स्पर्धापारशिवनी : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये वेधच्यावतीने सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन केले होते. यात दोन्ही गटात एकूण ३८९५ विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धसाठी इयत्ता तिसरी ते पाचवी आणि इयत्ता सहावी ते आठवी असे दोन गट तयार केले होते.***ओव्हरलोड वाहनांची वाहतूक बंद करा रामटेक : तालुक्यातील कांद्री शिवारात आरटीओचा चेकपोस्ट तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी ओव्हरलोड वाहनांवर कारवाई केली जात असल्याने वाहनचालक नाका चुकविण्यासाठी आडमार्गाचा सर्रास वापर करतात.त्यामुळे रस्ते खराब झाल्याने ही वाहतूक बंद करण्याची मागणी केली जात आहे.***भाजपचे सदस्य नोंदणी अभियानकाटोल : भाजपच्या काटोल तालुका शाखेच्यावतीने सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले. यात भाजपचे शहर अध्यक्ष ॲड. दीपक केणे, प्रा. धनंजय झलके, संजय कावळे, प्रकाश सवाणे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.***वाडी येथे नेत्रतपासणी शिबिरवाडी : स्थानिक नवनीतनगरात नेत्रतपासणी व रक्तदान शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले. यावेळी आ. समीर मेघे, माजी आ. विजय घोडमारे, सतीश जिंदल, पुरुषोत्तम रागीट, सुरेशा रिनके, नरेश चरडे, प्रेम झाडे, आनंद कदम सुजित नितनवरे, अक्षय कुणावर उपस्थित होते.***नांदागेामुख येथे धार्मिक कार्यक्रमसावनेर : तालुक्यातील नांदागोमुख येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात एकादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम तथा महादेवाच्या गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. सदर कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. ***