२७... मौदा
By admin | Updated: December 27, 2014 18:54 IST
बॅनरच्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला
२७... मौदा
बॅनरच्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला मौद्यातील घटना : आरोपीला अटकमौदा : पाणीपुरीचे बॅनर लावण्यावरून उद्भवलेल्या वादात तरुणावर चाकूहल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना मौद्यातील जुनी मच्छीसाथ येथे गुरुवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. यात मौदा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. कमलेश ओमप्रकाश कावळे (२७, रा. जुनी मच्छीसाथ, मौदा) असे गंभीर जखमी तरुणाचे नाव असून, पुरुषोत्तम नामदेव नागपुरे (३७, रा. जुनी मच्छीसाथ, मौदा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कमलेश व पुरुषोत्तम दोघेही एकाच भागात राहतात. कमलेश हा बेरोजगार असल्याने त्याने त्याच्या घराशेजारी पाणीपुरी विकण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यातच त्याने गुरुवारी पाणीपुरीचे बॅनर लावले. पुरुषोत्तमला त्या ठिकाणी बॅनर लावणे पसंत पडले नाही. त्याने गुरुवारी रात्री सदर बॅनर काढून जाळले. कमलेशने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यातच कमलेशने त्याला बॅनर का जाळले, असे विचारताच त्याने कमलेेशच्या मानेवर चाकूने वार केले. कमलेश जखमी अवस्थेत खाली कोसळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्याच्यावर स्थानिक शासकीय रुग्णालयात प्रथमोपचार करून नागपुरातील मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले. या प्रकरणी मौदा पोलिसांनी भादंवि ३०७ अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली. सदर घटनेचा तपास उपनिरीक्षक तायडे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)***