शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
4
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
5
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
6
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
7
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
8
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
9
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
10
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
11
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
12
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
13
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
14
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
15
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
16
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
17
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
18
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
19
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
20
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स

द्विवर्षपूर्तीनिमित्त भाजपाचे २६ मे ते १५ जूनपर्यंत विकासपर्व

By admin | Updated: May 25, 2016 03:45 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त देशभरातील दोनशे विशेष केंद्रातून सरकारच्या विकास कामांची यशोगाथा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त देशभरातील दोनशे विशेष केंद्रातून सरकारच्या विकास कामांची यशोगाथा लोकांपर्यंत पोहोचविली जाणार आहे. यासाठी भाजपच्या वतीने २६ मे ते १५ जूनपर्यंत ‘विकास पर्व’ आयोजित केले जाणार आहे. एक केंद्रीय मंत्री, एक राज्यमंत्र, राष्ट्रीय आणि राज्यपातळीवरील नेत्यांचा समावेश असलेली ३३ पथके या विशेष केंद्रांना भेट देऊन मोदी सरकारची कामगिरीचा लेखाजोखा मांडणार आहेत.विरोधकांनी महत्त्वपूर्ण विधेयकांचा मार्ग रोखत विकासाच्या मार्गात कशापद्धतीने आडकाठी घालण्याचा प्रयत्न केला. तसेच यावर मात करून दोन वर्षाच्या अल्पावधीत सरकारने लोककल्याणासोबत विकासाची काय-काय कामे केली, याचीही जनतेला माहिती दिली जाणार आहे, असे सर्व मंत्री आणि विभाग प्रमुखांंना पाठविण्यात आलेल्या अंतर्गत चिठ्ठीत म्हटले आहे.२६ मे रोजी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्ववाखाली सरकारला दोन वर्षे पूर्ण होत आहे. या दोन वर्षातील सरकारची कामगिरी मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यत पोहोचविण्यात येणार आहे. त्यानुसार सरकारच्या विविध योजनांच्या फायद्याबाबत माहिती देणे, उद्योग क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संघटना, संस्थासोबत तसेच बिगरराजकीय बैठकी घेणे, शेतकरी, महिला संघटना, वकील, डॉक्टरांशीही संवाद साधणे, आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. याशिवाय पत्रकार परिषद घेणे, मुलाखतीच्या माध्यमातूनही सरकारची कामगिरी लोकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. रालोआ खासदारांना कमीत कमी दोन दिवस आणि एक सायंकाळ आपापल्या मतदार संघात जाऊन लोकांची गाऱ्हाणी ऐकून त्यावर काढण्यास सांगण्यात आले आहे.खासदार आणि पथकातील सदस्यांना सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच भाजपचे आठ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन दिवस योजनांचा प्रचार करतील.