शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘वंदे भारत’ने वाचवले लोकांचे २५०० तास; राजस्थानात ‘वंदे भारत’ला हिरवा झेंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 06:16 IST

राजस्थानला बुधवारी पहिली ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस मिळाली. या मध्यम उच्चगती रेल्वेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला.

जयपूर :

राजस्थानला बुधवारी पहिली ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस मिळाली. या मध्यम उच्चगती रेल्वेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला. या रेल्वेमुळे देशवासीयांचे प्रवासातील आतापर्यंत २५०० तास वाचले, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या कार्यक्रमात सामील झाले. त्यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर जयपूरहून सकाळी साडेअकराच्या सुमारास वंदे भारत एक्स्प्रेस दिल्ली कॅन्टोन्मेंटसाठी रवाना झाली. मोदी गेहलोत यांना म्हणाले, तुमच्या दोन्ही हातात लाडू आहेत. रेल्वेमंत्री राजस्थानचे आहेत आणि रेल्वे बोर्डाचे अध्यक्षही राजस्थानचे आहेत. २०१४ नंतर रेल्वेत झपाट्याने बदल सुरू झाले. वंदे भारत रेल्वेने जयपूरहून दिल्लीला जाणे सोपे होईल. या रेल्वेमुळे राजस्थानच्या पर्यटनालाही मदत होणार आहे. गेल्या दोन महिन्यांतील ही सहावी वंदे भारत रेल्वे आहे, जिचे लोकार्पण झाले, असे मोदी म्हणाले. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, खासदार कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड आणि इतर काँग्रेस-भाजप नेतेही उपस्थित होते.

रेल्वेला राजकारणाचा आखाडा बनवले होते...वंदे भारत रेल्वे भारताला एका विकासाच्या प्रवासाकडे घेऊन जाईल. रेल्वेसारख्या महत्त्वाच्या यंत्रणेलाही रेल्वे भरतीच्या माध्यमातून राजकारणाचा आखाडा बनवण्यात आले होते हे देशाचे दुर्दैव आहे. ६० लाख प्रवाशांना लाभवंदे भारत रेल्वे सुरू झाल्यापासून आतापर्यंत ६० लाख लोकांनी या गाड्यांमधून प्रवास केला आहे. गती हे तिचे वैशिष्ट्य आहे. यामुळे वेळेची बचत होत आहे. देशभरात धावणाऱ्या वंदे भारत रेल्वेमुळे लोकांचे २५०० तास वाचवले आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

संकटात असतानाही...मुख्यमंत्री गेहलोत यांनी रेल्वेशी संबंधित काही मागण्या केल्या आहेत, याकडे लक्ष वेधून मोदी म्हणाले, ‘एक मित्र म्हणून, तुम्ही (गेहलोत) दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी कृतज्ञ आहे. मी गेहलोतजींचे विशेष आभार व्यक्त करतो की, सध्या राजकीय संकटात असतानाही त्यांनी विकासकामांसाठी वेळ काढला, रेल्वेच्या कार्यक्रमात भाग घेतला. 

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस