शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल पंपच ग्राहकांना लावतात 250 कोटींचा चुना !

By admin | Updated: April 30, 2017 13:53 IST

पेट्रोल पंपांनाही या टॅम्परिंग"ची किडीनं अक्षरशः पोखरून काढलं आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 30 - गेल्या काही दिवसांपासून देशात "टॅम्परिंग"ची कीड डोकं वर काढत असल्याचं ब-याचदा समोर आलं आहे. आता पेट्रोल पंपांनाही या टॅम्परिंग"ची किडीनं अक्षरशः पोखरून काढलं आहे. गाडीत पेट्रोल भरताना आपण पहिल्यांदा लीटरच्या आकड्यांकडे लक्ष देतो आणि त्याप्रमाणेच पैसे भरतो. मात्र मशिनच्या आत इलेक्ट्रॉनिक चिफ बसवून प्रत्येक खेपेला 10 टक्के कमी पेट्रोल देऊन वाहन चालकांना लुटण्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशात उघड झाला आहे. पेट्रोल पंपांनी केलेल्या या पेट्रोल चोरीमुळे दरवर्षी वाहन चालकांना 250 कोटी रुपयांचा गंडा घातला जातोय.प्रत्येक वर्षी 3.5 कोटी ग्राहक एकूण 59,595 सरकारी पेट्रोल पंपांवरून 2500 रुपयांचे पेट्रोल-डिझेल भरत असल्याची माहिती पेट्रोलियम मंत्रालयाच्या आकडेवारीतून समोर आली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवून ही चोरी पकडली आहे. मात्र उत्तर प्रदेशातच नव्हे, तर देशभरात असे प्रकार चालत असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या एसटीएफने सात पेट्रोल पंपांवर धाडी घातल्यानंतर सा सर्व प्रकार उजेडात आला आहे. या सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोलचोरीसाठी मशिनच्या आत इलेक्ट्रॉनिक चिफ बसवण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. ग्राहक डिस्पेन्सरमध्ये पाहून मोजमापानुसार पेट्रोलचे पैसे देतात, पण प्रत्यक्षात इथे दिसणाऱ्या आकड्यांपेक्षा गाडीत पेट्रोल 10 ते 15 टक्के कमी भरले जाते. या प्रकरणाचे तपासप्रमुख रविंदर यांनी सांगितले की, ही पेट्रोल चोरी मोठ्या प्रमाणावर होत आहे. उत्तर प्रदेशच्या 1000 पेट्रोल पंपांवरच्या सर्व 1000 डिस्पेन्सिंग मशिनमध्ये इलेक्ट्रॉनिक चिफ बसवल्याचं आढळलं आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक नियुक्त करण्यात आले असून, शनिवारी या पथकाने मुरादाबाद जिल्ह्यातल्या पाच अन्य पेट्रोलपंपांवर धाडी घातल्या आहेत. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यूपी एसटीएफचे या कारवाईसाठी कौतुक केले असून, दोषींवर कडक कारवाईचेही आदेश दिले आहेत.