२५ लाखासाठी विवाहितेचा छळ, सासरच्या १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By admin | Updated: December 18, 2015 00:29 IST
जळगाव : घर घेण्यासाठी माहेरुन २५ लाख रुपये आणावे यासाठी शहरातील लक्ष्मीनगरमधील माहेर असलेल्या मयूरी दामोदर गुल्हाणे (२८) या विवाहितेचा छळ केल्या प्रकरणी तसेच मारहाण केल्या प्रकरणी पतीसह सासरच्या दहा जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२५ लाखासाठी विवाहितेचा छळ, सासरच्या १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव : घर घेण्यासाठी माहेरुन २५ लाख रुपये आणावे यासाठी शहरातील लक्ष्मीनगरमधील माहेर असलेल्या मयूरी दामोदर गुल्हाणे (२८) या विवाहितेचा छळ केल्या प्रकरणी तसेच मारहाण केल्या प्रकरणी पतीसह सासरच्या दहा जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मीनगरातील माहेर असलेल्या मयूरी गुल्हाणे या विवाहितेचा माहेरुण २५ लाख रुपये आणावे म्हणून आर्वी, जि. वर्धा येथे मानसिक व शारीरिक छळ करीत तिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तसेच माहेरी येऊन तिला मारहाणदेखील करण्यात आली होती. या प्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरुन पती दामोदर रामभाऊ गुल्हाणे, रामभाऊ गणपत गुल्हाणे (सासरे), बेबीबाई गुल्हाणे (सासू), पंकज गुल्हाणे (दीर), दामोदर बनारसे (मावस सासरे), नंदा बनारसे, माया बनारसे (मावस सासू), माया बनारसे यांचे पती (नाव समजू शकले नाही) सर्व . रा. नागपूर, लता अभिजित गुल्हाणे (नणंद), रा. अमरावती, मोना अनुज श्रीराव (मावस नणंद), रा. यवतमाळ यांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ देविदास सुरदास हे करीत आहे.