शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

१५ नाही २४ पक्ष सहभागी होणार! विरोधकांची ताकद वाढणार; सोनिया गांधी बंगळुरुतील बैठकीला जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 17:58 IST

Opposition Party Meet in Bangalore: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधी पक्षांची एकजूट करण्याचा प्रयत्न केला जात असून, पाटणानंतर आता बंगळुरूत बैठक होत आहे.

Opposition Party Meet in Bangalore: सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला धूळ चारण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली असल्याचे पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांची पहिली महत्त्वाची बैठक बिहारमधील पाटणा येथे झाली होती. आता ही बैठक बंगळुरू येथे होणार आहे. पाटणा येथील बैठकीत सुमारे १५ विरोधी पक्ष सहभागी झाले होते. मात्र, बंगळुरू येथे होणाऱ्या बैठकीला २४ पक्ष सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या बैठकीला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी हजेरी लावू शकतात, असे म्हटले जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपविरोधातील पक्षांचे बळ वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. एमडीएमके, केडीएमके, व्हीसीके, आरएसपी, मुस्लिम लीग, केरळ काँग्रेस (जोसेफ), केरळ काँग्रेस (मणी) हे काही पक्ष आता १७-१८ जुलै रोजी बेंगळुरू येथे होणाऱ्या बैठकीत सहभागी होऊ शकतात, असे बोलले जात आहे. 

सोनिया गांधी बंगळुरुतील बैठकीला जाणार

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना बेंगळुरू येथे होणाऱ्या बैठकीचे निमंत्रण पाठवले आहे. १७ जुलै रोजी सर्वांसाठी रात्रीच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तर १८ जुलै रोजी सकाळी ११ वाजल्यापासून बैठकीला सुरुवात होणार आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी सांगितले होते की, खरगे यांनी विरोधी पक्षनेत्यांना तसेच सोनिया गांधी यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. सोनिया गांधी या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती आम्हाला देण्यात आल्याचे शिवकुमार यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, कांग्रेस, टीएमसी, डीएमके, आम आदमी पक्ष, जेडीयू, आरजेडी, सीपीएम, सीपीआय, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट, समाजवादी पार्टी,  नेशनल कॉन्फ्रेंस, पीडीपी, सीपीआई एमएल, जेएमएम, आरएलडी, आरएसपी, आययूएमएल, केरल कांग्रेस एम, वीसीके, एमडीएमके, केडीएमके, केरल कांग्रेस (जे), फॉरर्वड ब्लॉक या पक्षांचे नेते बंगळुरूतील बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. पाटणा येथील झालेल्या बैठकीला १५ विरोधी पक्षांचे २७ नेते उपस्थित राहिले होते.  

टॅग्स :lok sabhaलोकसभाBengaluruबेंगळूर