पाटणा : बिहारच्या विविध भागांत गेल्या २४ तासांमध्ये वीज कोसळून २४ जण मरण पावले आणि सुमारे १५ जण जखमी झाले आहेत. वैशाली, रोहतास, पाटणा, सरण, गया, समस्तीपूर, औरंगाबाद व आरिया या जिल्ह्यांमध्ये वीज पडून लोक मरण पावल्याचे प्रकार घडले. प्रत्येक मृतांच्या कुटुंबाला चार लाख रुपयांची मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे. बिहारमध्ये बरीचशी घरे गवत आणि बाम्बूच्या साह्याने बनविलेली असतात. त्यामुळे जून ते सप्टेंबरमध्ये विजा कोसळून वित्त व मनुष्यहानीच्या अनेक घडना घडतात.
बिहारमध्ये विजा कोसळून २४ जणांचा मृत्यू
By admin | Updated: July 11, 2017 01:27 IST