शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

२३२ चिनी ॲप्सवर बंदी; जुगार, बेटिंग आणि मनी लाँड्रिंगवर केंद्र सरकारने केला जोरदार प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 06:12 IST

"ब्लॉक केलेल्या २३२ पैकी १३८ ॲप हे बेटिंग, जुगार, मनी लाँडरिंगशी संबंधित, तर उर्वरित ९४ ॲप हे कर्जपुरवठ्याशी निगडीत आहेत."

नवी दिल्ली : जुगार, बेटिंग, कर्जपुरवठा व मनी लाँडरिंगशी संबंधित चीन व इतर देशांची सुमारे २३२ ॲप केंद्र सरकारने ब्लॉक केली आहेत. हा आदेश शनिवारी संध्याकाळी जारी करण्यात आल्याची माहिती केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान खात्याच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. अशी कारवाई करण्याची सूचना केंद्रीय गृहखात्याने इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान खात्याला केली होती. त्या खात्याच्या अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की ब्लॉक केलेल्या २३२ पैकी १३८ ॲप हे बेटिंग, जुगार, मनी लाँडरिंगशी संबंधित, तर उर्वरित ९४ ॲप हे कर्जपुरवठ्याशी निगडीत आहेत. मात्र त्या ॲपच्या नावांचा तपशील केंद्र सरकारने जाहीर केलेला नाही. चीन व इतर देशांमधून ही ॲप चालविली जात होती. या ॲपमुळे भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थैर्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने ही कारवाई करण्यात आली. 

भारतीय अडकले कर्जाच्या सापळ्यात- चीनने ॲपच्या माध्यमातून भारतीयांना कर्जाच्या सापळ्यात अडकविले आहे. कमी व्याजदराने कर्ज देण्याचे प्रलोभन दाखवून हे चिनी ॲप लोकांना आपल्याकडे वळवितात. - त्यानंतर दरसाल अवाजवी व्याज आकारले जाते. कर्जवसुलीसाठी या ॲपच्या कर्मचाऱ्यांकडून लोकांना धमक्याही देण्यात येत होत्या. - आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये काही लोकांनी आत्महत्या केली. त्याची गांभीर्याने दखल घेऊन केंद्राने या चिनी ॲपवर कारवाई केली. 

कर्जपुरवठ्याच्या नावाखाली शेल कंपन्यांद्वारे व्यवहार- कर्जपुरवठा करणाऱ्या चिनी ॲपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मनी लाँडरिंग होत असल्याचे प्रकार उघडकीस आले होते. शेल कंपन्यांद्वारे हे सर्व व्यवहार होत असल्याचे निष्पन्न झाले. - या ॲपद्वारे कर्ज घेतलेल्यांपैकी ज्यांच्या कर्जाचे हप्ते थकले आहेत, त्यांना धमकीचे फोन आले होते. अशा सर्व घटनांचा तपास करण्यात आला. ज्या ॲपद्वारे मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार होत असल्याने त्यांना ब्लॉक करण्यात आले.

सार्वभौमत्वाला धोका असल्याने ॲपविरोधात कठोर भूमिका केंद्र सरकारने याआधी चीनचे २५० ॲप ब्लॉक करण्याची कारवाई केली होती. कारवाई केलेल्या ॲप्समध्ये टिकटॉक, कॅमस्कॅनर आदींची समावेश होता. पब्जी मोबाइल गेम ॲपही सरकारकडून ब्लॉक करण्यात आले होते. देशाची सुरक्षा, सार्वभौमत्व यांना धोका पोहोचविणाऱ्या ॲपविरोधात केंद्र सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. टिकटॉक आणि  पब्जीसारख्या ॲपकडे भारतातील वापरकर्त्यांच्या असलेल्या माहितीचा चीनमध्ये मोठ्या प्रमाणात  गैरवापर करण्यात येत होता.  

टॅग्स :IndiaभारतchinaचीनNarendra Modiनरेंद्र मोदीXi Jinpingशी जिनपिंग