२३... कोराडी... जोड
By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST
दरम्यान, पोलीस अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करीत रंगारी यांच्यासह नागरिकांची समजूत काढत त्यांना शांत केले. या कारवाईमध्ये या परिसरातील एकूण ११ दुकाने जमीनदोस्त करण्यात आली.
२३... कोराडी... जोड
दरम्यान, पोलीस अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करीत रंगारी यांच्यासह नागरिकांची समजूत काढत त्यांना शांत केले. या कारवाईमध्ये या परिसरातील एकूण ११ दुकाने जमीनदोस्त करण्यात आली.यावेळी सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता वामन खापेकर, उपविभागीय अभियंता श्याम चौधरी, शाखा अभियंता मदन यांच्यासह महसूूल विभागातील अधिकारी व कोराडी पोलीस उपस्थित होते. कोराडीचे ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांच्या नेतृत्वात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (वार्ताहर)---------कोट---------कोराडी टी पॉईंट ते देवी मंदिर मार्गालगत पेंच प्रकल्पाचा डावा कालवा गेला आहे. या कालव्याच्या परिसरातील जागा ही सिंचन विभागाची आहे. या कालव्याच्या देखभालीची जबाबदारीही सिंचन विभागाची आहे. मागील ३० वर्षांपासून या कालव्याची दुरुस्ती अपेक्षित आहे. या जागेवर अतिक्रमण करून काहींनी बेकायदेशीर बांधकामही केले. त्यामुळे कालव्याच्या भिंतीला धोका उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली. भविष्यातील अनर्थ टाळण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असून, ती योग्य आहे.- वामन खापेकरकार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग***