शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Narendra Modi: केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासाठी २२५ प्रकल्प मंजूर, मोदींनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 17:05 IST

''महाराष्ट्राच महासंकल्प'' या रोजगार मेळाव्यानिमित्त महाराष्ट्रील शेकडो युवकांना आज नियुक्तीपत्र देण्यात आली

नवी दिल्ली -  देशातील स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ( Amrit Mahotsav of Independence ) 75 हजार रोजगार देण्याच्या महाराष्ट्राच्या महासंकल्पातील पहिल्या टप्प्यात युवकांना आज नियुक्तीपत्रे देण्यात आली. पंतप्रधान, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सरकारी नोकरीत लागलेल्या विविध अडीच हजार व्यक्तींना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडिओ कॉन्फेरेन्सींगद्वारे संवाद साधला. भविष्यात महाराष्ट्रात रोजगाराच्या अगणित संधी निर्माण होतील. सरकारकडून त्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं मोदींनी म्हटलं. तसेच, महाराष्ट्रात २२५ प्रकल्पांचे काम सुरू असल्याचंही ते म्हणाले. 

''महाराष्ट्राच महासंकल्प'' या रोजगार मेळाव्यानिमित्त महाराष्ट्रील शेकडो युवकांना आज नियुक्तीपत्र देण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदनपर कौतुक केले. तसेच, आगामी काळात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. त्यामध्ये, गृहविभागात पोलिसांची मोठी भरती होणार असून ग्रामीण विकास विभागातही रोजगार निर्मित्ती होणार असल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं. 

सरकारकडून नवनवीन रोजगार निर्मित्तीसाठी प्रयत्न केले जात आहेत. बँक गॅरंटी घेऊन मुद्रा योजनेच्या माध्यमातून २० हजार कोटी रुपयांचं कर्जवाटप केलं आहे. तसेच, लघुउद्योग, मध्यम उद्योग, एमएसएमई उद्योजकांना आर्थिक ताकद देत आहे. सर्वच प्रवर्गांना समान रुपाने रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत, त्यामध्ये महिलांनाही समान संधी मिळत आहे.  केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासाठी २ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे २२५ कोटी प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. या प्रकल्पांवर सध्या काम सुरू आहे किंवा लवकरच काम सुरू होणार आहे. महाराष्ट्रात रेल्वेसाठी ७५ हजार कोटी रुपये आणि आधुनिक रस्त्यांसाठी ५० हजार कोटींचे प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. सरकारकडून पायाभूत सुविधांवर एवढा खर्च होत आहे, मग यातूनही लाखो लोकांना रोजगार उपलब्ध होतो, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले. तसेच, भविष्यात महाराष्ट्रात रोजगाराच्या अगणित संधी उपलब्ध होतील हा मला विश्वास आहे, असेही मोदींनी म्हटले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUnemploymentबेरोजगारीEknath Shindeएकनाथ शिंदेjobनोकरी