२२... आत्महत्या
By admin | Updated: January 23, 2015 01:05 IST
शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
२२... आत्महत्या
शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्यानागपूर : शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घाटरोहणा येथे मंगळवारी सायंकाळी घडली. सदाशिव नत्थूजी मारबते (५८, रा. घाटरोहणा, ता. पारशिवनी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ते मंगळवारी दुपारी नेहमीप्रमाणे शेतात गेले होते. दरम्यान, सायंकाळी शेतातील झोपडीमध्ये त्यांनी विष प्राशन केले. त्यावेळी त्यांचा मुलगाही शेतात काम करीत होता. रात्र होत असल्याने मुलाने त्यांना घरी चलण्यासाठी सूचना केली. त्यांनी काहीही प्रतिसाद न दिल्याने तो झोपडीजवळ गेला. त्यावेळी ते बेशुद्धावस्थेत पडले असल्याचे त्याला आढळून आले. मुलाने त्यांना लगेच गावात आणले. तोवर त्यांच्या मृत्यू झाला होता. त्यांच्याकडे पावणेपाच एकर कोरडवाहू शेती असून, ते पेंच नदीत मासेमारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. त्यांना चार मुली असून, दोन मुले आहेत. त्यांच्याकडे बँकेचे कर्ज थकीत होते. शिवाय, यावर्षी नापिकी झाल्याने ते सतत चिंतेत असायचे, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. त्यांच्यावर असलेल्या कर्जाची माहिती कळू शकली नाही. या प्रकरणी कन्हान पेालिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी)***