२२... कोराडी
By admin | Updated: January 23, 2015 01:05 IST
महिलेवर अतिप्रसंग
२२... कोराडी
महिलेवर अतिप्रसंगकोराडी : महिलेवर अतिप्रसंग करणाऱ्या दोघांना कोराडी पोलिसांनी नुकतीच अटक केली. हा प्रकार जुलै २०१४ पासून सुरू असून, या संदर्भात गुरुवारी सकाळी तक्रार नोंदविण्यात आली.संदीप कुरील (२२) व सुमित बोरकर (२०) दोघेही रा. महादुला, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सदर महिला ही कोराडी महादुला परिसरातील रहिवासी असून, ती आर. डी. गोळा करण्याचे काम करायची. याच व्यवसायातून तिची व दोन्ही आरोपींची ओळख झाली. पुढे या दोघांचेही तिच्या घरी येणे-जाणे सुरू झाले. दरम्यान, या दोघांनीही तिच्यावर घरी अतिप्रसंग केला. त्यानंतर आरोपी संदीपने तिला कार्यालयीन कामाच्या बहाण्याने सावनेर येथे नेले. आधी घडलेल्या प्रकारची वाच्यता करण्याची धमकी देत हॉटेलमध्ये तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी कोराडी पोलिसांनी सदर महिलेच्या तक्रारीवरून भादंवि ३७६ (२)(जी),५०६ (ब), ४५२ अन्वये गुन्हा नोंदवून दोघांनाही अटक केली. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. (वार्ताहर)***