शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

यंदाच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले २१३ नवे राजकीय पक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 05:19 IST

संख्या गेली ६७७ वर; १० वर्षांत ३०० नव्या पक्षांची झाली नोंदणी

नवी दिल्ली : सन २००९ च्या तुलनेत आताच्या लोकसभा निवडणुकीत तब्बल २१३ नवे राजकीय पक्ष उतरल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली. गेल्या १० वर्षांत निवडणूक रिंगणात नव्याने उतरलेल्या राजकीय पक्षांच्या संख्येत सुमारे ३०० ने वाढ झाली आहे.

आयोगाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार सन २००९ मध्ये लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या राजकीय पक्षांची संख्या ३६८ होती. सन २०१४ मध्ये ती वाढून ४६४ झाली व आताच्या लोकसभा निवडणुकीत ती ६७७ वर पोहोचली. नव्या पक्षांमध्ये गेल्या पाच वर्षांत झालेली ८४ टक्के वाढ ही लक्षणीय आहे.यंदाच्या लोकसभा निवडणुुकीच्या आधी नव्या राजकीय पक्षांची नोंदणी करण्याचे जणू पेवच फुटले. एप्रिल २०१८पर्यंत निवडणूक आयोगाकडे सुमारे दोन हजार अमान्यताप्राप्त पक्ष नोंदलेले होते. त्यानंतर डिसेंबरपर्यंत आणखी २३८ नवे पक्षांची नोंदणी झाली आणि आणखी २४ पक्षांनी नोदणीसाठी अर्ज केले.मिळणारी मते मात्र किरकोळनिवडणुकीत उमेदवार उभे करणाºया अशा पक्षांची संख्या खूप मोठी असली व ती सतत वाढत असली तरी त्यांची मतांची टक्केवारी जेमतेम एक टक्का आहे. आयोगाच्या एका अधिकाºयाच्या मतानुसार भारतातील पक्ष नोंदणीची प्रक्रिया खूपच सोपी व सुलभ असणे हे या मोठ्या संख्येचे एक कारण आहे. जाणकारांना मात्र राजकीय पक्ष काडण्यामागे केवळ निवडणुका लढविणे हेच कारण असल्याचे वाटत नाही. त्यांच्या मते अनेक पक्ष काळा पैसा पांढरा करण्यासाठी, देणग्या जमविण्यासाठी व प्राप्तिकरात सूट मिळविण्यासाठी काढले जातात.