शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

जूनमध्ये महिलांविरुद्ध सर्वाधिक २०४३ तक्रारी; महिला आयोगाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 04:30 IST

आठ महिन्यांतील सर्वाधिक संख्या

नवी दिल्ली : राष्ट्रीय महिला आयोगाला (एनसीडब्ल्यू) जूनमध्ये महिलांविरुद्धच्या २०४३ तक्रारी मिळाल्या आहेत. ही संख्या गत आठ महिन्यांतील सर्वाधिक आहे.

एनसीडब्ल्यूने दिलेल्या माहितीनुसार, केवळ जूनमध्ये कौटुंबिक हिंसाचाराच्या ४५२ तक्रारी मिळाल्या आहेत. एकूण २०४३ तक्रारी मिळाल्या असून छळाच्या ६०३ तक्रारी आहेत. या आकडेवारीनुसार, गत वर्षी सप्टेंबरनंतर यावर्षी जूनमध्ये सर्वाधिक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. गतवर्षी सप्टेंबरमध्ये एनसीडब्ल्यूला २३७९ तक्रारी मिळाल्या होत्या.

एनसीडब्ल्यूच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी सांगितले की, सोशल मीडिया आता खूपच सक्रिय असल्याने तक्रारींची संख्या वाढली आहे. आता टिष्ट्वटर आणि अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तक्रारी दाखल करता येतात. तक्रारी दाखल करण्यासाठी आम्ही व्हॉटस्अ‍ॅप नंबर दिलेला आहे. लोकांना माहीत आहे की, आम्ही मदत करीत आहोत आणि त्यामुळे त्यांना आमच्यावर विश्वास आहे. या आकडेवारीनुसार, विवाहित महिलांचा छळ आणि हुंड्यासाठी छळाच्या २५२ आणि विनयभंगाच्या १९४ तक्रारी मिळाल्या आहेत. महिलांप्रती पोलिसांच्या अनास्थेच्या ११३ आणि महिलांविरुद्ध सायबर गुन्ह्याच्या १०० तक्रारी मिळाल्या आहेत. बलात्कार आणि बलात्काराच्या प्रयत्नाच्या ७८ आणि लैंगिक छळाच्या ३८ तक्रारी मिळाल्या आहेत. जूनमध्ये आयोगाने हुंडाबळीच्या २७ आणि विवाहासंबंधी आणि आॅनर किलिंग वा त्या संबंधीच्या ४५ तक्रारी मिळाल्या आहेत.

टॅग्स :Womenमहिला