शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

२०२४ ची तयारी? BRS च्या सभेत एकत्र येणार विरोधक, तेलंगणात एकाच व्यासपीठावरुन केजरीवाल-अखिलेश बरसणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 16:09 IST

तेलंगणातील सत्ताधारी भारत राष्ट्र समितीची (BRS) बुधवारी खम्मम शहरात जाहीर सभा होणार आहे

नवी दिल्ली-

तेलंगणातील सत्ताधारी भारत राष्ट्र समितीची (BRS) बुधवारी खम्मम शहरात जाहीर सभा होणार आहे, ज्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (भाकपा) नेते के डी राजा देखील सामील होतील.

तेलंगणातील ही जाहीर सभा राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे कारण तेलंगणा राष्ट्र समितीने 'बीआरएस' असं नाव बदलल्यानंतर होणारी ही पहिलीच जाहीर सभा आहे. त्यात बीआरएस, आम आदमी पार्टी (आप), समाजवादी पार्टी (एसपी) यांच्यासह विविध विरोधी पक्षांचीही हजेरी असणार आहे. डाव्या पक्षांचे नेते व्यासपीठावर एकत्र दिसतील.

यदाद्री येथील भगवान लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरालाही भेट देणारबीआरएसचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि इतर नेते बुधवारी खम्ममला जाण्यापूर्वी हैदराबादजवळील यदाद्री येथील भगवान लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिराला भेट देतील. राव सरकारने नुकतंच मंदिराचं नूतनीकरण केलं आहे. वरिष्ठ बीआरएस नेते आणि माजी खासदार बी विनोद कुमार म्हणाले की, सभेसाठी हजर राहणारे नेते हैदराबादपासून सुमारे २०० किमी अंतरावर असलेल्या खम्मममध्ये तेलंगणा सरकारच्या नेत्र तपासणी कार्यक्रमाच्या कांती वेलुगुच्या दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनाला उपस्थित राहणार आहेत.

एनडीए सरकारमध्ये धर्मनिरपेक्षता-समाजवादाची कमतरता भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारमध्ये धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि उदारमतवादासह संविधानाचा आत्मा कमकुवत होत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशात पर्यायी राजकारण आणण्यासाठी बीआरएस प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. २०२४ च्या लोकसभा निवडणुका लक्षात घेता खम्मम जाहीर सभेकडे विरोधी ऐक्याचे पाऊल म्हणून पाहिले जाऊ शकतं का, असं विचारलं असता कुमार म्हणाले की ही केवळ पुनरावृत्ती होणारी आघाडी नाही आणि बीआरएस हा देशाला नवा पर्याय ठरू शकतो असाही दावा करण्यात आला आहे. 

भाजपाचा 'केसीआर'वर हल्लाबोलदरम्यान, भाजपच्या प्रदेश युनिटचे अध्यक्ष आणि खासदार बंदी संजय कुमार यांनी मुख्यमंत्री केसीआर राव यांच्यावर निशाणा साधला. इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना यादद्री मंदिरात नेल्याबद्दल टिका केली. "मंदिरे या कुटुंबासाठी उद्योग केंद्रे बनली आहेत. हिंदू मंदिर ही गुंतवणुकीची संधी आहे हे दाखवण्यासाठी केसीआर राव बीआरएस खम्ममच्या जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना नेत आहेत का?". असा सवाल उपस्थित करत भाजपा खासदारानं टीका केली.

 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAkhilesh Yadavअखिलेश यादव