शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

'आगामी लोकसभा निवडणूक जगातील सर्वात महागडी ठरेल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 17:57 IST

2014 च्या निवडणुकीवर 5 बिलियन डॉलर्स इतका खर्च आला होता

नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक जाहीर होण्यास अवघ्या काही आठवड्यांचा कालावधी शिल्लक आहे. ही निवडणूक भारताच्याच नव्हे, तर जगाच्या इतिहासातली सर्वात महागडी निवडणूक असेल, असा दावा अमेरिकास्थित तज्ज्ञानं केला. पुढील महिन्यात निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. पुढील दोन ते तीन महिन्यात होणारी लोकसभा निवडणूक जगाच्या इतिहासातील सर्वात महागडी निवडणूक असेल, असा दावा मिलन वैष्णव यांनी केला. वैष्णव कार्गी इन्डॉवमेंट फॉर इंटरनॅशनल थिंक टँकच्या दक्षिण आशिया विभागाचे संचालक आहेत. '2016 मध्ये अमेरिकेत झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी 6.5 बिलियन डॉलर्सचा खर्च आला होता. तर 2014 मध्ये भारतात झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी आलेला खर्च 5 बिलियन डॉलर्स इतका होता. आगामी लोकसभा निवडणुकीचा खर्च नक्कीच 6.5 बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त असेल. त्यामुळे ही जगातील सर्वात महागडी निवडणूक ठरेल,' अशी आकडेवारी वैष्णव यांनी सांगितली. येत्या निवडणुकीत भाजपा आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार टक्कर होईल. सत्ताधारी आणि विरोधरकांमधील संघर्ष अटीतटीचा असेल. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खर्च होईल, असा कयास त्यांनी व्यक्त केला. भारतीय निवडणुकांमध्ये खर्च होणारा पैसा यावर वैष्णव यांचा गाढा अभ्यास आहे. 'येत्या निवडणुकीचा निकाल काय असेल, याची कल्पना नाही. मात्र ही निवडणूक जगातील सर्वात महागडी असेल, याबद्दल शंका नाही,' असं वैष्णव म्हणाले. भारतातील राजकीय पक्ष, नेते यांना मिळणाऱ्या निधीचा नेमका आकडा कधीच कळत नाही. कारण निधी मिळणारा पक्ष आणि पैसे देणारी व्यक्ती कधीच याबद्दलची स्पष्ट माहिती जाहीर करत नाही, असं निरीक्षणदेखील त्यांनी नोंदवलं.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९ElectionनिवडणूकUSअमेरिकाAmericaअमेरिका