शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

२०१६मध्ये बॉलिवूडमध्ये पाहायला मिळणार हटके जोड्या

By admin | Updated: March 17, 2016 19:13 IST

राज कपूर-मधुबाला, अनिल कपूर-माधूरी, शाहरुख-काजोल ते वरुण-आलिया पर्यंत बॉलीवूडने प्रत्येकवेळी नव्या जोड्या दिल्या आहे. २०१६ मध्ये आपल्याला बॉलीवूडमध्ये काही नवीन जोड्या पाहयचे योग वाढलेत

- नामदेव कुंभार

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ - राज कपूर-मधुबाला, अनिल कपूर-माधूरी, शाहरुख-काजोल ते वरुण-आलिया पर्यंत बॉलीवूडने प्रत्येकवेळी नव्या जोड्या दिल्या आहे. आणि त्या एव्हरग्रीन जोड्याना प्रेषकांनीही तेवढीच दाद दिली आहे. निर्माता-दिग्दर्शक प्रत्येक चित्रपटावेळी काहीना काही नवीन देण्याचा प्रयत्न करत असतो. २०१६ मध्ये आपल्याला बॉलीवूडमध्ये काही नवीन जोड्या पाहयचे योग वाढलेत. त्यांचा नवीन रंग पहायला मिळणार आहे. या वर्षभरात बॉलीवूडमध्ये नवून जोड्या पहायला मळणार आहेत. या वर्षात प्रेक्षकांच्या मनात आपला ठसा उमटवणाऱ्या जोड्यावर टाकलेला हा प्रकाशझोत...
 
 
आमीर खान - साक्षी तन्वर (दंगल) :-
बॉलिवुडचा मिस्टर परफेक्ट आमिर खान त्याच्या आगामी चित्रपटात साक्षी तन्वर सोबत काम करताना दिसणार आहे. कुस्तीचा विषय असलेल्या या चित्रपटात लालमातीत मेहनत करणारा आमिर नव्या अवतारात पाहायला मिळणार आहे. 
 
 
      
 
कुस्तीपटू महावीर फोगट यांच्या जीवनावर आधारीत हा चित्रपट असेल. महावीर यांनी आपली मुलगी गीता फोगट आणि बबिता कुमारी यांना ऑलंपिक खेळासाठी प्रशिक्षण दिले होते. आमिर खान या चित्रपटाचा सहनिर्माता आहे तर याचे संगीत प्रितम करणार आहेत. दंगल चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी करीत असून सिध्दार्थ रॉय कपूर निर्माते आहेत. २०१६ च्या ख्रिसमसमध्ये हा चित्रपट सर्वत्र झळकणार आहे. 
 
 
अर्जुन कपूर-करीना कपूर (कि अॅण्ड का): - 
अर्जुन कपूर आणि करीना कपूर त्यांच्या चाहत्यांना नव्या वर्षाच्या सुरुवातीला चित्रपटाची मेजवानी देण्यासाठी सज्ज झाले आहेत. आगामी 'कि अॅण्ड का' या चित्रपटात हे दोघे कबीर आणि किया या विवाहीत दाम्पत्याची भूमिका साकारणार आहेत.
 
ही पहिलीच वेळ आहे जेव्हा अर्जुन आणि करिना रुपेरी पडद्यावर एकत्र झळकताना दिसतील. विशेष म्हणजे अमिताभ आणि जया बच्चन या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार आहेत. आर बल्की दिग्दर्शित 'कि अॅण्ड का' यावर्षी १ एप्रिलला प्रदर्शित होईल.
 
रणबीर कपूर-ऐश्वर्या राय बच्चन-अनुष्का शर्मा : -
 
बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेत वेगाने पसरत असलेली बातमी म्हणजे करण जोहरच्या आगामी 'ए दिल है मुश्किल' चित्रपटात रणबीर कपूर प्रमुख भूमिका करणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूरसोबत अनुष्का शर्मा आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या प्रमुख भमिका आहेत. चित्रपट २८ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. 
 
शाहरुख खान-आलिया भट्ट :- 
शाहरुख खान-आलिया भट्ट यांच्यातील वयाचे अंतर २८ वर्ष एवढे आहे. ‘इंग्लिश विंग्लिश’ या पहिल्याच चित्रपटानंतर मोठी विश्रांती घेतलेल्या दिग्दर्शक गौरी शिंदेने आगामी चित्रपटाची तयारी सुरू केली आहे.
 
 
 
गौरीच्या नव्या चित्रपटासाठी थेट बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान, अलिया भट्ट आणि निर्माता म्हणून करण जोहर अशी नामी मंडळी एकत्र आली आहेत. चित्रपटाची पटकथा लिहून तयार झाली आहे आणि नुकतेच गौरीने चित्रपटासाठी शाहरुख खान आणि अलिया भट्ट यांच्याशी बोलून त्यांची नावेही निश्चित केली आहेत. मात्र, चित्रपटाचे नाव काय आहे इथपासून ते ही प्रेमकथा आहे की आणखी वेगळा विषय असे सारे तपशील अजून गुलदस्त्यात आहेत. 
 
 
ह्रतिक रोशन-पुजा हेगडे :-
बँग बँग’ चित्रपटात शेवटचा दिसलेला हृतिक पुजा हेगडे या नवोदित अभिनेत्रीबरोबर ‘मोहंजो दारो’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. प्रदिर्घ कालावधीनंतर आशुतोष गोवारीकर यांचा महत्वकांक्षी चित्रपट 'मोहन्जो दारो' मध्ये झळकणार आहे. पूजा हेगडेचा हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट आहे. १२ ऑगस्ट २०१६ ला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 
नवाजुद्दीन सिद्दीकी-श्रद्धा कपूर :- 
अभिनयाने सर्वांना भुरळ घालणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि बबली गर्ल श्रद्धा कपूर लंच बॉक्स फेम दिग्दर्शक रितेश बत्राच्या आगामी रोमँटिक चित्रपटात सोबत दिसणार आहे.  I’m A Photographer असे चित्रपटाचे नाव आहे. 
 
सलमान खान-अनुष्का शर्मा :- 
सलमान खान आणि अनुष्का शर्मा सुल्तान या आगामी चित्रपटात एकत्र झळकणार आहेत.२०१६ च्या ईदला हा चित्रपट प्रदर्शन होणार आहे. 'प्रेम रतन धन पायो' चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर सलमान खान 'सुल्तान' साठी खूप मेहनत करीत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक अली अब्बास जफर आहेत. यशराज बॅनरखाली बनत असलेल्या या चित्रपटात सलमान कुस्तीपटूची भूमिका साकारणार आहे.
 
शाहिद कपूर-कंगना राणावत :- 
विशाल भारद्वाज यांच्या 'रंगून' चित्रपटासाठी शाहिद कपूर-कंगना राणावत एकत्र आले आहेत. या चित्रपटात सैफ अली खानचा हा मुख्य रोल आहे.
१४ ऑक्टोबर २०१६ ला चित्रपटगृहात झळकणार आहे. १९४० च्या दशकातील प्रेमकथेवर हा चित्रपट आहे. शाहिदने यापूर्वी विशाल भारद्वाज यांच्या 'कमीने' आणि 'हैदर' चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटांप्रमाणे आता 'रंगून' प्रेक्षकांवर काय छाप सोडते, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
 
रणवीर सिंग-वाणी कपूर
बाजीराव मस्तानीच्या प्रचंड यशानंतर रणवीर सिंग आदित्य चोप्राच्या बेफिक्रे या चित्रपटात वाणी कपूर सोबत झळकणार आहे. हो चित्रपट २० ऑक्टोबर २०१६ रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे. 'बेफिक्रे' चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य चोप्रा स्वतः करणार आहे.
७ वर्षाच्या मोठ्या काळानंतर आदित्य दिग्दर्शकाच्या भूमिकेत वावरणार आहे. त्याने ७ वर्षापूर्वी 'रब ने बनादी जोडी' हा शाहरुख आणि अनुष्का शर्माचा शेवटचा चित्रपट केला होता. २००८ सालात हा चित्रपट हिट ठरला होता. आदित्या चोप्राने रणवीर सिंगला पाच वर्षापूर्वी पहिल्यांदा हिरो बनायची संधी दिली होती. गेल्या पाच वर्षात रणवीर बॉलिवूडमध्ये स्थिर झाला असून तो सध्या बॉक्स ऑफिसवरचा यशस्वी नायक आहे. 'बेफिक्रे'सारख्या मोठ्या चित्रपटात आदित्यने संधी दिल्यामुळे तो खूप आनंदात आहे. 
 
शाहरुख खान-माहीरा खान 
राहुल ढोलकिया बॉलिवूडसाठी तब्बल ५ वर्षानंतर 'रईस' चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. पाकिस्तानी अभिनेत्री माहीरा खान शाहरुखच्या नायिकेची भूमिका करणार आहे. रईस ईदच्यावेळी प्रदर्शन करण्याचा निर्णय घेण्यात आले आहे. त्याच दिवशी सलमान खानचा सुल्तानही झळकतो आहे.
 
त्यामुळे टिकीट खिडकीवर कोणत्या चित्रपटाला यश मिळणा हे प्रेषकांच्या कौल वर नक्की होईल. माहीरा पाकिस्तानातील लोकप्रिय टीव्ही शो हमसफरमध्ये भूमिका करीत आहे. 'रईस' या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन सिध्दकी, फरहान अख्तर आणि शाहरुख खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.