शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

'2014 च्या आधी लिंचिंग शब्द ऐकायला मिळत नव्हता...', राहुल गांधींचे केंद्रावर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 13:03 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील लिचिंगच्या घटनांवरुन भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली: पंजाबमध्ये शिख समुदायाकडून झालेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांच्या मृत्यूवरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यातच काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लिचिंगच्या घटनांवरुन मोदी सरकारवर टीका केली आहे. '2014 च्या आधी (मोदी सरकार येण्यापूर्वी) लिंचिंग (Lynching)  हा शब्द ऐकायला मिळत नव्हता,'असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

राहुल गांधींचे ट्विट:

पंजाबच्या अमृतसर आणि कपुरथलामध्ये जमावाकडून दोन जणांची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. हे प्रकरण शिख समाजाच्या भावनेशी संबंधित असल्यामुळे दोन्ही घटनांबाबत बहुतांश राजकारणी उघडपणे बोलायला तयार नाहीत. पण, पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी अवमान करणाऱ्यांना सर्वांसमोर फासावर लटकवले पाहिजे, असे वक्तव्य केले आहे. त्यानंतर आता राहुल गांधींनी लिचिंगवर भाष्य केले आहे.

भाजपचा पलटवार

राहुल गांधींच्या या ट्विटवर भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी पलटवार केला आहे. त्यांनी राहुल गांधींचे वडील राजीव गांधी यांना लिंचिंगचे जनक म्हटले आहे. मॉब लिंचिंगचे जनक राजीव गांधी यांनी त्यांच्या काळात अनेक हत्या केल्या. महिलांवर बलात्कार केला. शिखांच्या गळ्यात जळके टायर टाकले, असा आरोप त्यांनी केला आहे.

सुवर्ण मंदिर आणि कपूरथला येथे काय घडले?

अमतृतसरच्या सुवर्ण मंदिर आणि कपूरथला येथील लिंचिंगच्या घटनेने राज्यात तसेच संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. रविवारी कपूरथलाच्या निजामपूर गावात एका गुरुद्वारामध्ये एका तरुणाची बेदम मारहाण करुन हत्या करण्यात आली. त्याच्यावर निशान साहिबचा(शिखांचा धार्मिक ध्वज) अपमान केल्याचा आरोप होता. मात्र, नंतर हे प्रकरण चोरीचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्या व्यक्तीला कित्येक तास खोलीत कोंडून ठेवले आणि तलवारीने वारही केले. या घटनेत तीन पोलीसही जखमी झाले आहेत.

दुसऱ्या एका घटनेत शनिवारी एका अज्ञात व्यक्तीने सुवर्ण मंदिराच्या आतील ग्रिलवर चढून पवित्र गुरू ग्रंथ साहिबचा अवमान केला. त्या व्यक्तीने तिथे ठेवलेली तलवारही उचलली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. यावेळी लोकांनी त्याला पकडून जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. या दोन घटनांनंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीPunjabपंजाब