शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगडच्या गोशाळेत २00 गार्इंचा मृत्यू?  उपासमारीमुळे  गाई मेल्याचा स्थानिकांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 23:49 IST

छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील गोशाळेत झालेल्या गायींच्या मृत्युप्रकरणी पोलिसांनी गोशाळेच्या संचालकाला अटक केली आहे. हा संचालक भारतीय जनता पार्टीचा नेता आहे.

दुर्ग :  छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील गोशाळेत झालेल्या गायींच्या मृत्युप्रकरणी पोलिसांनी गोशाळेच्या संचालकाला अटक केली आहे. हा संचालक भारतीय जनता पार्टीचा नेता आहे. त्या गोशाळेत २७ गायींचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असले, तरी गावकºयांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही काळात तिथे २00 हून अधिक गायी मरण पावल्या आहेत. छत्तीसगडमधील गोसेवा आयोगाने केलेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. गोशाळेची भिंत कोसळून २७ गायींचा मृत्यू झाला, असा दावा संचालक हरीश वर्मा याने केला आहे. तो जामुल नगरपालिकेचा उपाध्यक्ष आहे. गावकºयांनी आरोप केला की, तिथे रात्री जेसीबी मशिन आणल्या जात होत्या आणि जवळच खड्डे खणून त्यात अनेक गायी पुरण्यात आल्या आहेत.  गोसेवा आयोगाने केलेल्या तक्रारीनुसार गोशाळेत प्रचंड अस्वच्छता होती. यामुळे प्रचंड दुर्गंधी व रोगराईही पसरली होती. दुर्गचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय अग्रवाल यांनी सांगितले की, जिल्ह्यातील धमधा विकासखंड अंतर्गत येणाºया राजपूर गावातील गोशाळेत गेल्या तीन दिवसांत २७ गायींचा मृत्यू झाला आहे. जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ गायींच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर पशुवैद्यांचे पथक चौकशीसाठी राजपूरला पाठवण्यात आले. उपविभागीय दंडाधिकाºयांनीही घटनास्थळाचा दौरा केला. पूर्ण चौकशीनंतरच जनावरांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.  संचालक हरीश वर्माने सांगितले की, १५ आॅगस्ट रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे गोशाळेतील ९0 फूट लांब भिंत कोसळली. या दुर्घटनेत जखमी झाल्याने २७ गायींचा तीन दिवसांत मृत्यू झाला. जखमी गायींवर उपचार सुरू आहेत. (वृत्तसंस्था)उपासमारीने मृत्यू : काँग्रेसकाँग्रेसने गायींचे मृत्यू उपासमारीमुळे झाल्याचा आरोप केला आहे. छत्तीसगड काँग्रेसचे प्रवक्ते आर. पी. सिंह म्हणाले की, स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार चारा व पाणी देण्यात न आल्यानेच गायींचा मृत्यू झाला आहे. या गोशाळेत प्रचंड अस्वच्छता आहे, ज्यामुळे आतापर्यंत या गोशाळेमध्ये सुमारे ३00 गायी मरण पावल्या आहेत. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.