शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

२० वर्षीय तरुणीने एकाच वेळी दिला ५ मुलींना जन्म; बनली ६ मुलांची आई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 05:38 IST

बिहारच्या किशनगंज येथील प्रकार; मुलींचे वजन १ किलोच्या आत

एसपी सिन्हालोकमत न्यूज नेटवर्कपटणा : एका महिलेने एकाचवेळी ५ मुलींना जन्म दिल्याचा प्रकार बिहारमधील  किशनगंज जिल्ह्यात घडला असून, हा विषय संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. यामुळे येथील नागरिकांमध्ये हा कौतुकाचा विषय झाला आहे.

ठाकूरगंज ब्लॉकमधील कनकपूर पंचायतअंतर्गत असलेल्या जलमिलिक गावात एका महिलेने एकाच वेळी ५ मुलींना जन्म दिला आहे. सर्व मुली आणि त्यांची आई निरोगी असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व मुलींचे वजन एक किलोच्या आत आहे. महिलेला आधीच तीन वर्षांचा मुलगा आहे. आता ती ६ मुलांची आई झाली आहे. कुटुंबात पाच मुली आल्याने घरात आनंदाचे वातावरण आहे.

आव्हानात्मक असतानाही केली नॉर्मल डिलिव्हरी nताहिरा बेगम (वय २०) असे या महिलेचे नाव आहे. ताहिरा म्हणाली की, जेव्हा मी २ महिन्यांची गरोदर होती, तेव्हा माझ्या पोटात पाच मुले असल्याचे कळले.nयानंतर मला भीती वाटायला लागली. मात्र, डॉक्टरांनी मला घाबरण्यासारखे काही नसल्याचे सांगितले. महिलेच्या कुटुंबीयांनी सांगितले की, ताहिर बेगमने ५ मुलींना जन्म दिला आहे. घरातील सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. रेजा नर्सिंग होमच्या डॉ. फरजाना यांनी आव्हानात्मक असतानाही नॉर्मल डिलिव्हरी केली. हे अतिशय कौतुकास्पद आहे. 

अशी प्रकरणे फार कमी वेळा समोर येतात. महिलेच्या पोटात ५ मुले असल्याचे समोर आले. महिलेला हे कळताच ती घाबरली होती. मात्र, आम्ही तिला प्रोत्साहन दिले. हे प्रकरण आव्हानात्मक होते. ती इतर नियमित तपासणीसाठी येत असे. सकाळी तिला प्रसूती वेदना होत असताना तिची प्रसूती झाली. हे प्रकरण आव्हानात्मक असतानाही महिलेची नॉर्मल डिलिव्हरी झाली. - डॉ. फरजाना, रेजा नर्सिंग होम.

टॅग्स :Biharबिहार