२०... उमरेड... पाऊस
By admin | Updated: February 21, 2015 00:50 IST
उमरेड
२०... उमरेड... पाऊस
उमरेड उमरेड : परिसरात शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यात १५ ते २० मिनिटे गारपीट झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. उमरेड परिसरात सकाळी १० वाजतापासून ढगाळ वातावरण तयार झाले होते. त्यातच दुपारी २ वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. या वादळी पावसामुळे तसेच गारपिटीमुळे गहू, हरभरा, मिरची, तूर, आंबा व लिंबूवर्गीय फळांचे नुकसान झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)----कुहीकुही शहरासह तालुक्यातील मांढळ परिसरात शुक्रवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. या पावसामुळे तालुक्यातील रबी पिकांचे फारसे नुकसान झाल्याची तसेच वीज कोसळून प्राणहानी झाल्याचे वृत्त नाही. (तालुका प्रतिनिधी)***