२०... सारांश... जोड
By admin | Updated: February 21, 2015 00:50 IST
अनधिकृत भूखंड अधिकृत करण्याची मागणी
२०... सारांश... जोड
अनधिकृत भूखंड अधिकृत करण्याची मागणीनरखेड : तालुक्यातील सावरगाव येथील काही भूखंडावर नागरिकांचे २५ वर्षांपासून वास्तव्य आहे. त्यामुळे अनेकांनी पक्के बांधकाम केले असून, ते भूखंड अधिकृत करण्याची मागणी नागरिकांनी आ. डॉ. आशिष देशमुख यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.***कंपनीतील दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्तनिहारवाणी : नजीकच्या गोपिवाडा येथे अल्कोहोल तयार करण्याची कंपनी आहे. रात्रीच्यावेळी या कंपनीतील अल्कोहोलचा उग्र वास सर्वदूर पसरतो. त्यामुळे निहारवाणी येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. सदर प्रकाराची पर्यावरण विभागाने दखल घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.***