२०... निषेध
By admin | Updated: February 21, 2015 00:50 IST
गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध
२०... निषेध
गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा निषेधउमरेड : गोविंद पानसरे यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याचा शहरातील साामजिक संघटनांच्यावतीने निषेध करण्यात आला. यावेळी घेण्यात आलेल्या सभेला जैबुन्निसा शेख, गोविंद वनवे, राजेंद्र श्रावणे, दिलीप अंजनकर, मनोज बालपांडे, किसन गवळी, गजानन ढोबळे, पांडुरंग बुचे, दिवाकर माळवे, प्रा. मंगेश जगताप, मोहन चिचूलकर, किरण यावले, राजेंद्र शिंदे, विशाल मोहिते, अनिल राऊत उपस्थित होते. शिवजयंतीच्या पर्वावर घडलेली ही घटना निषेधार्ह आहे. कॉम्रेड पानसरे यांनी १५ वर्षांपूर्वी शिवाजी कोण होते, हे पुस्तक लिहून जनजागृती घडवून आणली होती. शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष होते, अशी मांडणी त्यांनी केली होती. उपस्थित मान्यवरांनी या हल्ल्याचा निषेध करून आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी केली असून, आंदोलनाचा इशारा देण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)***