शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हत्तींना पळवून लावण्यासाठी करण्यात आला गोळीबार; गोळी लागल्यानं दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 22:15 IST

Assam : आसामचे वनमंत्री परिमल शुक्लबैद्य यांनी सांगितले की, मुलाच्या मृत्यूची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी वनविभागाचे एक उच्चस्तरीय पथक संबंधित भागात पाठवण्यात आले आहे.

गुवाहाटी - आसाममध्ये हत्तींच्या कळपाला हुसकावून लावण्यासाठी वनविभागाने केलेल्या गोळीबारात दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. तर त्याची आई जखमी झाली आहे. महिलेला उपचारासाठी गुवाहाटी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही घटना शुक्रवारी कामरूप जिल्ह्यातील बोनाडापारा परिसरात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, भाताच्या शेतात हत्तींच्या कळपाने एका व्यक्तीला जखमी केले होते. यासंदर्भात स्थानिक लोकांनी वनाधिकारी आणि स्थानिक पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांसह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी हत्तींचा कळप जंगलाच्या दिशेने पळवून लावण्यासाठी हवेत गोळीबार केला. यादरम्यान घटनास्थळावरून घरी परतणाऱ्या एका चिमुकल्यासह त्याच्या आईला चुकून गोळी लागली.

स्थानिक लोक, पोलीस आणि वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी मुलाला आणि त्याच्या आईला बोको भागातील रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले, तर आईची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला गुवाहाटी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मृत मुलाच्या वडिलांनी सांगितले की, माझी पत्नी मुलाला घेऊन गावातील इतर लोकांसह हत्तींचा कळप पाहण्यासाठी गेली होती. तेथून परतत असताना पत्नी आणि मुलाला गोळी लागली. यानंतर, स्थानिक लोकांनी राष्ट्रीय महामार्ग-17 बराच वेळ जाम करत चौकशीची मागणी केली. यासंदर्भात, आसामचे वनमंत्री परिमल शुक्लबैद्य यांनी सांगितले की, मुलाच्या मृत्यूची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी वनविभागाचे एक उच्चस्तरीय पथक संबंधित भागात पाठवण्यात आले आहे.

टॅग्स :Firingगोळीबार