शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

२ लाख सरकारी नोकऱ्या संपवल्या : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 08:04 IST

या सरकारच्या काळात देश विक्रमी बेरोजगारीने ग्रासला आहे, असे राहुल गांधी पुढे म्हणाले.

नवी दिल्ली : सरकारी कंपन्यांमधील तब्बल दोन लाख नोकऱ्या संपवण्यात आल्या आहेत. सरकार आपल्या काही भांडवलदार मित्रांच्या फायद्यासाठी लाखो तरुणांच्या आशा चिरडून टाकत असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.ते म्हणाले की, सरकारी कंपन्या (पीएसयू) हे भारताचा अभिमान आणि प्रत्येक तरुणाचे रोजगाराचे स्वप्न होते. परंतु आज ते ‘सरकारचे प्राधान्य’ नाही. सरकारी कंपन्यांमधील नोकऱ्या २०१४ च्या १६.९ लाखांवरून २०२२ मध्ये १४.६ लाखांवर आल्या आहेत. प्रगतीशील देशात नोकऱ्या कमी का होत आहेत?.

हा कसला अमृतकाळ उद्योगपतींची कर्जमाफी करणे आणि सरकारी कंपन्यांमधील नोकऱ्या संपवणे हा कसला अमृतकाळ आहे. जर हा अमृतकाळ असेल तर अशा नोकऱ्या का गायब होत आहेत, असा सवाल राहुल यांनी केला.  या सरकारच्या काळात देश विक्रमी बेरोजगारीने ग्रासला आहे, असे राहुल गांधी पुढे म्हणाले.

कंत्राटी कामगार म्हणजे आरक्षण संपवणे? नोकऱ्यांची संख्या वाढवण्याऐवजी दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे खोटे आश्वासन देणाऱ्यांनी दोन लाखांहून अधिक नोकऱ्या संपवल्या आहेत. याशिवाय या संस्थांमधील कंत्राटी भरती जवळपास दुप्पट झाली. कंत्राटी कर्मचारी वाढवणे हा आरक्षणाचा घटनात्मक अधिकार हिरावून घेण्याचा मार्ग नाही का? शेवटी या कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा डाव आहे का?     - राहुल गांधी, काँग्रेस नेते 

कुठे नोकऱ्या कमी झाल्या? बीएसएनएल     १,८१,१२७एमटीएनएल     ६१,९२८एसईसीएल     २९,१४०एफसीआय     २८,०६३ओएनजीसी     २१,१२०

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी