शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

देशात ५ वर्षांत रोज २ जातीय दंगली, दोषसिद्धी १० टक्केच; ५.३१ टक्क्यांवरच आरोप सिद्ध ​​​​​​​

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 11:11 IST

गृहमंत्रालयाकडील ताज्या आकड्यांनुसार गेल्या ५ वर्षांत जवळपास ३,४०० दंगली झाल्या. त्यात २,९३९ आरोपपत्र दाखल झाले. दोष सिद्धी फक्त ३४८ (१०.२३ टक्के) झाली.

नितीन अग्रवाल -नवी दिल्ली : देशात वेगवेगळ्या राज्यांत जातीय तणावाच्या घटना वाढत असताना केंद्र सरकारकडील अधिकृत माहितीनुसार गेल्या ५ वर्षांत देशात रोज सरासरी २ धार्मिक दंगली झाल्या आहेत.गृहमंत्रालयाकडील ताज्या आकड्यांनुसार गेल्या ५ वर्षांत जवळपास ३,४०० दंगली झाल्या. त्यात २,९३९ आरोपपत्र दाखल झाले. दोष सिद्धी फक्त ३४८ (१०.२३ टक्के) झाली. अटक झालेल्या १८,५१२ जणांपैकी फक्त ९८४ (५.३१ टक्के) जणांवर आरोप सिद्ध झाले. उत्तर प्रदेशात अपेक्षेनुसार सगळ्यात कमी ६५ धार्मिक दंगली झाल्या व २५ प्रकरणांत आरोप सिद्ध झाले. अटक झालेल्या ५०८ पैकी १२२ जणांवरील आरोप सिद्ध झाले.  राजस्थानातील ५५ दंगलींत ५० आरोप सिद्ध झाले. 

सर्वाधिक बिहारमध्ये -सर्वाधिक ७२१ दंगली बिहारमध्ये झाल्या. तेथे फक्त २.०८ टक्के आरोप सिद्ध झाले. अटक झालेल्या ५,०२२ जणांपैकी फक्त ८४ जणांवर आरोप सिद्ध झाले.

महाराष्ट्रात २५९ दंगली --     महाराष्ट्रात या कालावधीत २९५ दंगली झाल्या व फक्त २५९ प्रकरणी आरोपपत्र दाखल झाले. केवळ २ आरोप सिद्ध झाले.-     राज्यात २,५७६ जणांना अटक झाली व त्यातील फक्त २९ जणांवर आरोप सिद्ध झाले.

दिल्लीत किती? --     राजधानी दिल्लीत ५२१ दंगली झाल्या; परंतु एकाही प्रकरणी एकाही जणावर आरोप सिद्ध झाला नाही.-     २०७ प्रकरणांत आरोपपत्र दाखल झाले. यात ४९८ जण आरोपी असून, ४४३ जणांना अटक झाली. 

हरयाणात झाल्या ४२१ दंगली --     २०१६ ते २०२० दरम्यान हरयाणात ४२१ जातीय दंगली झाल्या. यात फक्त १७ घटनांत दोष सिद्ध झाला. राज्यात १,३६७ जणांना अटक झाली; परंतु फक्त १९ जणांवरच आरोप सिद्ध झाले.-     झारखंडमध्ये ३७१ दंगली झाल्या व १९३ घटनांत आरोपपत्र दाखल झाले. फक्त ११ जणांवर आरोप सिद्ध झाला. एकूण ६१७ जणांना अटक झाली तरी फक्त २१ जणांवरच आरोप सिद्ध झाले. 

टॅग्स :Courtन्यायालय