शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! 19 वर्षीय मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू; गरबा खेळताना खाली पडला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 15:26 IST

गरबा खेळण्याचा सराव करणाऱ्या एका मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. मुलाचं वय फक्त 19 ​​वर्षे होतं.

गुजरातमधील जामनगरमध्ये गरबा खेळण्याचा सराव करणाऱ्या एका मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. मुलाचं वय फक्त 19 ​​वर्षे होतं. तो गरबा क्लासमध्ये गरबा खेळण्याचा सराव करत असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर तो बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले. या घटनेनंतर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

विनीत मेहुलभाई कुंवरिया असं या मुलाचं नाव असून तो जामनगरमध्ये राहत होता. मामा दर्शन जोशीपुरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, विनीत गेली तीन-चार वर्षे सातत्याने गरबा स्पर्धेत भाग घेत होता. नवरात्र येण्यापूर्वीच तो गरबा-दांडियाचा सराव सुरू करायचा. बुधवारी संध्याकाळीही तो सरावासाठी गेला होता. क्लासमध्ये तो आपल्या ग्रुपसोबत सराव करत होता. 

विनीतच्या मित्रांनी सांगितले की, विनीत अचानक बेशुद्ध झाला आणि जमिनीवर पडला. त्याला उठवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो शुद्धीवर आला नाही. विनीतला त्याच्या मित्रांनी ऑटोमधून हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे तपासणी केल्यानंतर विनीतला मृत घोषित करण्यात आले. विनीतला हार्ट अटॅक आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याचबरोबर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे.

काही महिन्यांपूर्वी जामनगरमधील एका कार्डियक डॉक्टरचे वयाच्या 41 व्या वर्षी त्यांच्याच रुग्णालयात निधन झाले. जिम, क्रिकेटचे मैदान, शाळा आणि रस्त्यावर उभे असताना लोकांना हार्ट अटॅक येत आहे. कोरोनानंतर हार्ट अटॅकने होणाऱ्या मृत्यूच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे सांगण्यात आले. यामध्ये सर्व वयोगटातील लोकांचा समावेश आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटका