शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

दादर, कल्याण, ठाकुर्ली, अंधेरीसह १९ स्थानकांचा करणार पुनर्विकास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 06:09 IST

रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती, चार वर्षांत २४९४ कोटींचा झाला खर्च 

- हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : महाराष्ट्रातील १९ रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. तांत्रिक-आर्थिक व्यवहार्यता अभ्यासाच्या आधारावर या स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. त्यात मुंबई महानगर क्षेत्रातील दादरसह ७ रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. तर राज्यातील पुणे, नाशिक, नांदेड, अमरावती, भुसावळ या प्रमुख रेल्वे स्थानकांचाही पुनर्विकास होणार आहे.

रेल्वे, दळणवळण व इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत सांगितले की, या स्थानकांचा टप्प्याटप्प्याने विकास करण्यात येईल. या कामांमध्ये महत्त्वाची शहरे आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणांना यात प्राधान्य देण्यात येणार आहे. इम्रान प्रतापगढी यांनी याबाबत प्रश्न विचारला होता.

या स्थानकांचे काम यापूर्वीच हातीअजनी, जालना, औरंगाबाद, मुंबई सेंट्रल, ठाणे व नागपूर रेल्वेस्थानके यापूर्वीच मेजर अपग्रेडेशन ऑफ स्टेशन्स पुनर्विकासासाठी हाती घेतली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासाला आर्थिक व्यवहारासंबंधीच्या कॅबिनेट कमिटीने यापूर्वीच मंजुरी दिलेली आहे.

या स्थानकांचा होणार पुनर्विकासअकोला, अंधेरी, अमरावती, बांद्रा टर्मिनस, भुसावळ, बोरिवली, दादर, कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस, लोणावळा, मिरज, नांदेड, नाशिक रोड, पुणे, साईनगर शिर्डी, शिवाजीनगर पुणे, ठाकुर्ली, वर्धा रेल्वेस्थानकांचा पुनर्विकासासाठी अभ्यास करण्यात येणार आहे. 

राज्यातील १०८ रेल्वेस्थानकांचा समावेशnमहाराष्ट्रातील १०८ रेल्वेस्थानकांचा यापूर्वीच आदर्श स्थानकांच्या योजनेत विकास करण्यात आलेला आहे. देशभरात आदर्श रेल्वे स्थानक योजनेत १२५२ स्थानकांची निवड करण्यात आली. nत्यापैकी १२१८ स्थानके आजवर विकसित करण्यात आली आहेत. उर्वरित स्थानकांचा जून २०२३ पर्यंत विकास करण्यात येणार आहे. nग्राहक सुविधा योजनेत महाराष्ट्राला रेल्वेकडून सिंहाचा वाटा मिळाला आहे. चार वर्षांत २४९४ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलेला आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे