शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
2
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
3
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
4
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
5
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
6
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
7
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
8
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
9
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
10
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!
11
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
12
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
13
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
14
फक्त किराणाच नाही तर मॉलमध्ये शॉपिंगपासून ते सिनेमापर्यंत या गोष्टींवर भरघोस बचत; पाहा यादी
15
"मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
16
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
17
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर
18
काय आहे विमानाच्या टायरजवळची 'ती' जीवघेणी जागाा, जिथे बसून १३ वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानातून भारतात आला
19
GST कमी झाला आणि AC-TV च्या विक्रीत झाली जोरदार वाढ, किराणा दुकानदारांनाही 'अच्छे दिन'
20
Kuttu Atta: नवरात्री उपवासाचं कुट्टूचं पीठ ठरलं विषारी; १५० हून अधिक लोक आजारी, रुग्णालयाबाहेर रांगा!

१९... पेंच

By admin | Updated: December 19, 2014 22:56 IST

(फोटो)

(फोटो)
पेंच प्रकल्पाच्या दुरुस्तीवर अत्यल्प खर्च
नवेगावखैरीतील पेंचप्रकल्प जलाशय वार्धक्याकडे झुकला
* ४५ वर्षांत कोट्यवधींच्या नफ्यातूनही दुरुस्तीवर खर्च नाही
चंद्रशेखर गिरडकर ० पारशिवनी
तालुक्यातील नवेगाव (खैरी) येथील पेंच प्रकल्प नागपूर व भंडारा जिल्ह्यासाठी वरदान ठरला आहे. या जलाशयाच्या निर्मितीला ४५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात या प्रकल्पाने कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले. तुलनेत प्रकल्पाच्या दुरुस्तीवर फारसा खर्च करण्यात आला नाही.
पेंच प्रकल्पाला ऑगस्ट १९६९ मध्ये मंजुरी देण्यात आली. पेंचप्रकल्प ते तोतलाडोहपर्यंतचे ४६६१.५ चौ.कि.मी १८०० चौरस मैलाएवढी व्याप्ती असलेला हा परिसर आहे. सुरुवातीला मातीचे धरण १६३९ मीटर लांब, महत्तम उंची २६.८ मीटर धरणाचे बांधकाम प्रस्तावित होते. या बांधकामासाठी सन १९७९ मध्ये २५० कोटी रुपये खर्च प्रस्तावित होता. या परिसरातील सरासरी पर्जन्यमान १२०० मि.मी. व पेंच जलाशयातील पाणी साठवण्याची क्षमता २.३० दशलक्ष घनमीटरएवढी अंदाजित होती. प्रकल्पबाधित १२ गावापैकी पारशिवनी तालुक्यातील पाच गावे आहेत.
या प्रकल्पाच्या पाण्यावर नागपूर तालुक्यातील ३८३ हेक्टर, कामठी - १९.२०७ हेक्टर, सावनेर - ३.९०७ हेक्टर, पारशिवनी - १९.७१२ हेक्टर, रामटेक व मौदा - ३४.४६२ हेक्टर, भंडारा-९.३७७ हेक्टर, मोहाडी - १२.0२३ हेक्टर असे एकूण १, ०४,४७६ हेक्टर शेतीचे ओलित केले जाते. दरवर्षी मध्य प्रदेश व महाराष्ट्र सीमेलगत असलेल्या तोतलाडोह येथील जलाशयातील पाण्यातून ९६५ दशलक्ष घनमीटर पाणी पेंचप्रकल्प जलाशयात सोडल्या जाते. त्यापैकी ६८९ दशलक्ष घनमीटर पाणी शेतीसाठी दिले जाते. ज्यापासून सहा कोटी रुपये पाणसारा दरवर्षी शासनाला मिळतो.
नागपूर शहरासाठी ११२ दशलक्ष घनमीटर पाणीपुरवठ्यापासून ५० ते ६० हजार रुपये प्रति दिवस महसूल मिळतो. कोराडी व खापरखेडा येथील वीजनिर्मिती केंद्राला १२७ दशलक्ष घनमीटर पाणीपुरवठा केला जातो. नवेगावखैरी येथील मत्स्यबीज प्रजनन केंद्राला दोन दशलक्ष घनमीटर व भंडारा येथील सनफ्लॅग कंपनीला दोन दशलक्ष घनमीटर एवढा पाणीपुरवठा केला जातो. त्यापासून दरवर्षी पाटबंधारे विभागाला १७ ते १८ कोटी रुपयांचा महसूल मिळतो. जमा झालेल्या रकमेपैकी २० टक्के महसूल नागपूर जिल्हा परिषदेच्या सेसफंडात जमा केला जातो. लाभक्षेत्र कालव्यांच्या असंख्य जलवाहिन्यांच्या जाळ्यांच्या माध्यमातून शेतीसाठी पाणीपुरवठा करण्यात येतो. खरीप व रब्बी हंगामात विक्रमी उत्पादन घेतल्या जाते.