शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

राज्यसभेतील १९ सदस्य आठवडाभरासाठी निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 11:02 IST

तृणमूलच्या ७ आणि द्रमुकच्या ६ सदस्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कामकाजात व्यत्यय आणल्याने राज्यसभेतील १९ विरोधी पक्षाच्या सदस्यांना मंगळवारी आठवडाभरासाठी निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सात, द्रमुकच्या सहा, तेलंगणा राष्ट्र समितीच्या तीन, माकपाच्या दोन आणि भाकपाच्या एका सदस्याचा समावेश आहे. त्यांना शुक्रवारपर्यंत राज्यसभेच्या कामकाजात सहभागी होता येणार नाही. 

पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधी पक्षाचे सदस्य महागाई व दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील जीएसटीच्या मुद्यावरून सभागृहाचे कामकाज ठप्प पाडत आहेत. सोमवारी कामकाज ठप्प पाडत असल्याबद्दल लोकसभा अध्यक्षांनी काँग्रेसच्या ४ लोकसभा सदस्यांना अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठी निलंबित केले होते. मंगळवारीही याच मुद्यांवरून विविध घोषणा देत ते सभापतींसमोरील हौद्यात उतरले. उपसभापती हरिवंश यांनी त्यांना परत जाण्यास सांगितले. मात्र, त्यांनी नकार दिला. त्यामुळे उपसभापतींनी सत्ताधारी सदस्यांना त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडण्यास सांगितले.

कामकाज तीन वेळा तहकूबnसंसदीय कामकाज राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी १० विरोधी सदस्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. मात्र, उपसभापतींनी हा ठराव मतदानाला टाकताना १९ जणांची नावे घेतली. आवाजी मतदानाने हा ठराव मंजूर करण्यात आला. nनिलंबित सदस्यांनी सभागृहाबाहेर जाण्यास नकार देत जागेवरच फतकल मारली. त्यामुळे कामकाज तीन वेळा तहकूब करण्यात आले. पहिल्यांदा १५ मिनिटांसाठी, त्यानंतर एक तासासाठी आणि शेवटी दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले.

टॅग्स :Member of parliamentखासदारRajya Sabhaराज्यसभा