१९ धरणे आंदोलन
By admin | Updated: December 19, 2014 22:57 IST
श्री वाल्मिकी नवयुवक संघ
१९ धरणे आंदोलन
श्री वाल्मिकी नवयुवक संघनागपूर : असंघटित मागसवर्गीय समाजाच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय श्री वाल्मिकी नवयुवक संघाच्या वतीने हिवाळी अधिवेशनानिमित्त धरणे आंदोलन करण्यात येत आहे. प्रमुख मागण्या : सफाई कामगारांच्या वारसदारांना लाड-पागे समितीच्या शिफाशी लागू कराव्या, कामगारांच्या वारसदारांना नोकरी देण्यात यावी, लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार तयार करण्यात आलेल्या यादीची महानगरपालिकेकडून त्वरित चौकशी करण्यात यावी, संघटनेला गुरु वाल्मिकी आश्रमासाठी १४ एकर जमीन देण्यात यावी, वाल्मिकी आणि मेहतर समाजाला १० टक्के आरक्षण देण्यात यावे, महानगरपालिकेतील सफाई कामगारांना सात तारखेला वेतन देण्यात यावे, झोपडपट्टीचा विकास करावा आदी मागण्यांचा समावेश आहे.नेतृत्व : संघटनेचे प्रदेश संघटनमंत्री जगदीश खरे कार्यकर्ते : भूमिता निमगडे, सुंदरलाल टाभौरे, महेश जकोलिया, सतीश डागोर, प्रकाश जैदिया, राज हडोते, शिवप्रसाद नुन्हारे, रज्जन चावरिया, चंदू चव्हाण, रुख्खन डागोर, तारांचद मेहरोलिया, राहुल निमगडे, कमल मेहरोलिया, बबलू गंगाहेडे आदी.डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमजिवी पत्रकार संघनागपूर : पत्रकार संरक्षण कायदा करण्यात यावा यासह इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमजिवी पत्रकार संघाच्या वतीने धरणे आंदोलन सुरू आहे.प्रमुख मागण्या : पत्रकारांसाठी विधान परिषदेवर प्रतिनिधित्व देण्याकरिता कायदा करण्यात यावा, शासनाच्या इतर विभागाच्या दर्शनीय जाहिराती क वर्ग वृत्तपत्रांना देण्यत याव्या, अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करावे, पत्रकारांना आरोग्य सुविधा मोफत मिळावी, पत्रकारांचा १० लाख रुपयांचा विमा काढावा, साप्ताहिक व लघुवृत्त पत्रकारांना म्हाडा व तत्सम शासकीय उपक्रमात सवलत देण्यात यावी, साप्ताहिक वृत्तपत्रांच्या जाहिरात दरात दुप्पटीने वाढ करावी आदी मागण्यांचा समावेश आहे.नेतृत्व : संघाचे अध्यक्ष दिलीप नानवटे कार्यकर्ते : बंडू पोपटकर, मिलिंद जगदीश, मिलिंद पवनीपगार, महादेव शिरसाट, सुदर्शन गोडघाटे, संजय भंडारे, डॉ. प्रमोद चिचखेडे, चंदा भानुसे, पंजाब दामले, सुधीर शंभरकर, किशोर बावणे, अनंत चावरिया, सिद्धार्थ बोधिले, मो. फरीद, अरविंद साबळे, सुरेश चव्हाण, रविकांत पाटील, दीपक वाहणे आदी.