१८... कोदामेंढी... धान
By admin | Updated: December 18, 2014 22:39 IST
(फोटो)
१८... कोदामेंढी... धान
(फोटो)धानाच्या गंजीला आगबेरडेपार येथील घटना : अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान कोदामेंढी : धानाची कापणी करून शेतात लावण्यात आलेल्या गंजीला आग लावण्यात आल्याचा प्रकार बुधवारी सकाळी निदर्शनास आला. ही घटना कोदामेंढी नजीकच्या बेरडेपार येथे घडली. दिलीप भाकरू धोंगडे (४८) व सोहन सुदाम धोंगडे (३०) दोघेही रा. बेरडेपार, ता. मौदा, अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नाव आहेत. या दोन्ही शेतकऱ्यांची बेरडेपार शिवारात शेती आहे. दिलीपने यावर्षी तीन एकरात धानाची रोवणी केली होती. शेतातील धानाची कापणी करून त्याचे शेतातच गंजी लावली होती. त्याला अंदाजे ७० पोती धान होण्याची आशा होती. सोहनने यावर्षी अडीच एकरात धानाची रोवणी करून हा धान नुकताच कापला व शेतात गंजी लावली होती. त्याला अंदाजे ६० पोती धानाचे उत्पादन होण्याची आशा होती. दरम्यान, या दोन्ही शेतकऱ्यांच्या शेतातील धानाच्या गंज्या आगीत खाक झाल्याचे बुधवारी सकाळी निदर्शनास आले. यात अंदाजे १ लाख ९० रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. सदर दोन्ही शेतकरी अल्पभूधारक असल्याने हाती आलेले पीक नष्ट झाले. त्यामुळे शासनाने त्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांसह स्थानिक व परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)***