ग्रामीण मतदार संघास १८ कोटी
By admin | Updated: February 8, 2016 22:55 IST
जळगाव : जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघास दुष्काळ निधीपाटी १८ कोटींचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती आमदार गुलाबराव पाटील यांनी दिली.
ग्रामीण मतदार संघास १८ कोटी
जळगाव : जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघास दुष्काळ निधीपाटी १८ कोटींचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती आमदार गुलाबराव पाटील यांनी दिली. मतदारसंघातील जळगाव व धरणगाव तालुक्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले. खरीप पाटोपाठ रब्बीलाही फटका बसला. यामुळे शेतकरी वर्गा हवालदिली झाला होता. शासनाने मतदारसंघातील जळगाव तालुक्यासाठी ११ कोटी तर धरणगाव तालुक्यातील शेतकर्यांसाठी सात कोटींचा निधी दिला आहे. शेतकर्यांच्या खात्यात हा निधी लवकरच जमा होईल. दुष्काळाने हैराण झालेल्या शेतकर्यांना यामुळे काहीसा दिलासा मिळेल असा आशावाद आमदार गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.